कुत्रे पाळण्याच्या शौकीन लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते आपल्या लाडक्या प्राण्यासाठी काहीही करायला तयार असतात. कोणी त्याच्यासाठी डिझायनर कपडे बनवतात, तर कोणी त्याच्यासाठी आलिशान बर्थडे पार्टी ठेवतो. एका जोडप्याचे त्यांच्या कुत्र्यावर इतके प्रेम आहे की, त्यांनी त्यांच्या घराप्रमाणेच त्यांच्या कुत्र्याकरिताही दुमजली घर बांधले आहे. येथे त्याचा प्रिय कुत्रा अभिमानाने राहतो आणि त्याच्या नशिबाचा अभिमान बाळगतो.
ज्याप्रमाणे पालकांवर आरोप केले जातात की, त्यांनी जास्त पैसे देऊन आणि लाड करून मुलांचे लाड केले आहेत. तसाच ट्रेंड आता पाळीव प्राणी मालकांच्या खर्चाबाबतही सुरू झाला आहे. यावेळी, इंटरनेटवर असे अनेक पाळीव प्राणी मालक सापडतील, जे आपल्या प्राण्यांवर अवाजवी खर्च करतात आणि जगाला दाखवतात.
कुत्रे आणि मांजरींसाठी महागडी खरेदी केल्यानंतर, यावेळी टिकटॉकवर एका जोडप्याने त्यांच्या कुत्र्यासाठी बांधलेले घर दाखवले आहे. या जोडप्याने गोल्डन रिट्रीव्हरसाठी कुत्र्यासाठी घराऐवजी दुमजली इमारत उभारली आहे, जी त्याची वैयक्तिक जागा आहे. याशिवाय त्याचा स्वत:चा वैयक्तिक टीव्ही देखील आहे.
उँ्रस्रँी१ीॅ्र१’ नावाच्या ळ्र‘ळङ्म‘ खात्यावरून कुत्र्यासाठी बांधलेले हे अनोखे घर त्याच्या मालकिणीने भेट दिले होते. तिने सांगितले की, तिच्या पतीने घरातील पाळीव कुत्र्यासाठी स्वत:चे घर बनवून भेट दिली आहे. या डॉग हाऊसमध्ये कुत्र्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. त्याच्याकडे वैयक्तिक टीव्ही आहे, स्वत:चा बेड आहे आणि ख्रिसमससाठी स्वतंत्र ख्रिसमस ट्री देखील सजवण्यात आला आहे. एवढेच नाही तर कुत्र्याचा स्वत:चा फ्रीज देखील आहे, जिथे त्याचे खाद्यपदार्थ ठेवले जातात. घराला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून ते चांगले डिझाइन केलेले आहे. घरामध्ये कुत्र्याच्या खोलीच्या वरपासून खालपर्यंत एक स्लाइडही बसवण्यात आली आहे.
हा डॉग हाऊस व्हिडीओ टिकटॉकवर आतापर्यंत ५० दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. लोक कुत्र्याच्या जीवनशैलीचा हेवा करतात. एका यूजरने लिहिले आहे की, हा कुत्रा माझ्यापेक्षा चांगले आयुष्य जगत आहे, त्याला भाडेही द्यावे लागत नाही. आणखी एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली की त्याला रूममेट हवा आहे? मी पण भुंकू शकतो. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, तुम्ही न सांगता सांगितले की तुम्ही खूप श्रीमंत आहात.