“लाखो लोकांची मनं जिंकणाऱ्या सिद्धार्थचा त्याच्याच हृदयाने विश्वासघात केला”, अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख

एका मुलाखतीत अभिनेत्रीने घरच्याना सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना केली आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे संपूर्ण कला क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थचे निधन हृदययविकाराच्या झटक्याने झाले आहे अशी माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ शुक्ला आज आपल्यात नाही यावर कोणाचा विश्वास बसत नाही. कला विश्वातील अनेक जण सिद्धार्थला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रढांजली अर्पण करत आहे. ‘बिग बॉस १’ची विजेती आणि हिंदी ‘बिग बॉस १२’ ची सदस्य मेघा धाडेला देखील मोठा धक्का बसला आहे.

मेघाने ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्याच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या संभाव्य स्थितीबद्दल तिचे विचारही शेअर केले आहेत. ती म्हणते, “मला अजून विश्वास बसत नाही, मी सिद्धार्थच्या घरच्यांसाठी सहानभूती व्यक्त करते. मला माहीत नाही की ते या धकक्यातून कसे बाहेर येतील मला शेहनाज ची खुप काळजी वाटत आहे कारण ती सिद्धार्थशी खुप कनेक्टेड होती. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की या सर्वाना धकक्यातून सावरण्यासाठी बळ मिळो.”

मेघा पुढे सांगते, ” मी बिग बॉस १२ मध्ये सहभागी झाले होते आणि सिद्धार्थ शुक्ला १३ मध्ये . आमच्यात खुप कॉमन मित्र आहेत….आम्ही कधी भेटलो नसलो तरी बिग बॉस १२ मधील माझ्या परफॉर्मन्समुळे तो मला ओळखायचा. सिद्धार्थ शुक्लाचा चाहता वर्ग खुप मोठा होता आणि तो एक माणूस म्हणून पण खुप छान होता.”

“सिद्धार्थ शुक्लाच्या चाहता वर्ग स्वत:ला ‘सिडहार्ट’ नावाने संबोधायचे आता कुठे त्याला लोकप्रियता मिळाली होती. लाखो लोकांची मनं जिंकणाऱ्या सिद्धार्थचा त्याच्याच हृदयाने विश्वासघात केला आहे याचा मला मोठा धक्का बसला आहे.” असे तिने सांगितले. सोशल मीडियावर सध्या ‘#सिडनाज’ हे ट्रेंड होतं आहे या विषयी बोलताना ती म्हणली की “आता सिडनाज सिद्धार्थ शिवाय अपूर्ण आहे”.

About admin

अवश्य वाचा

रंगीलाविषयी शेफाली शाहचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री शेफाली शाहने राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या गाजलेल्या चित्रपटाविषयी एक आश्चर्यकारक खुुलासा केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *