प्रियांकाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या पती निक जोनससोबत असल्याचे दिसत आहे. त्याचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
प्रियांकाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका निकसोबत दिसत आहे. प्रियांकाने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर निक तिच्या पाठी चाकू आणि काटा घेऊन असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘स्नॅक’ असे कॅप्शन प्रियांकाने दिले आहे
प्रियांकाचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘शी यार हे काय झालं आहे तुम्हाला.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे सगळं करण्यासाठी तुला अमेरिकेला पाठवलं आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘याला म्हणतात अश्लीलता, आम्ही तुझ्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करत नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासारखा असल्याचं तुला वाटतं?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही काय भारताची संस्कृती आहे.’