‘नेहमी हसरा असणारा चेहरा…’, सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजला पाहून अभिनेता झाला भावूक

अलीचे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. सिद्धार्थच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर छोट्या पद्यावरील कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान अभिनेता अली गोणीने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर अली त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा सिद्धार्थची कथित गर्लफ्रेंड शेहनाज गिल देखील तेथे उपस्थित होती. शेहनाजला पाहून अलीने ट्वीट केले आहे. ‘नेहमी हसरा असणारा चेहरा… आनंदी असणारा चेहरा.. आज जसा पाहिला ते पाहून काळीज तुटलं’ या आशयाचे ट्वीट अलीने केले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

गुरुवारी संध्याकाळी कपूर रुग्णालयात सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टम पार पडले. जवळपास ४ तास हे पोस्टमॉर्टम सुरु होते. ५ डॉक्टरांच्या टीमने हे शवविच्छेदन केले असून त्याचा व्हिडीओ रेकॉर्डही करण्यात आलाय. आज पोलिसांकडून सिद्धार्थ शुल्काचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जारी केला जाईल. सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिव आधी जुहू येथील ब्रह्माकुमारी ऑफिसमध्ये नेण्यात येणार आहे. तिथे काही पूजा-विधी पार पडणार आहेत. त्यानंतर त्याचं पार्थिव घरी आणलं जाईल. सिद्धार्थ शुक्लाच्या आई रिता शुक्ला या गेल्या काही वर्षांपासून ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सिद्धार्थच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. अंतिमदर्शनानंतर आज सिद्धार्थवर अंतिमसंस्कार पार पडणार आहेत.

About admin

अवश्य वाचा

रिव्हिलिंग टॉपमध्ये पूनमने केले असे काही चाळे…

बॉलीवूडमध्ये अभिनयापेक्षा आपल्या बोल्डनेससाठी चर्चेत असणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. परंतु या सर्वांवर पूनम पांडे ही …

Leave a Reply

Your email address will not be published.