डोळे बंद करुनही सिद्धार्थला ओळखायची शेहनाज, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल रडू

सिद्धार्थच्या निधनानंतर त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. पण ‘बिग बॉस १३’ मध्ये सिद्धार्थला भेटलेली त्याची खास मैत्रिण शेहनाज गिलला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. शेहनाजचे सिद्धार्थवर असलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना ठावूक आहेच. त्यात तिने मोकळेपणाने नेहमीच तिच्या प्रेमाविषयी सांगितले आहे.

सिद्धार्थ शुक्लासोबत शेहनाजची मैत्री ‘बिग बॉस १३’मध्ये झाली. ते दोघे ही जवळचे मित्र होते. शेहनाजने बऱ्याचवेळा तिच्या भावना शेअर केल्या आहेत. तिला तर सिद्धार्थशी लग्न करायचे होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेहनाज सिद्धार्थला बंद डोळ्यांनीही ओळखत होती.

आणखी वाचा : वयाच्या ४०व्या वर्षी निधन झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे तरी कोण?

सिद्धार्थ आणि शेहनाज यांच्यात खूप चांगली मैत्री होती. ‘बिग बॉस १३’मध्ये ते दोघेही एकमेकांना सपोर्ट करताना दिसले. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याचा आणि शेहनाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘मुझसे शादी करोगे’ या शोमधला आहे. यात शेहनाज स्वत: साठी वर शोधण्यासाठी आली होती. शेहनाजला सपोर्ट करण्यासाठी शोच्या प्रीमिअर दरम्यान सिद्धार्थ पोहोचला होता.

आणखी वाचा : “मी पॅन्टवर अंडरवेअर परिधान केली तेव्हा मला…” प्रियांका चोप्राचं ‘त्या’ प्रश्नावर मजेशीर उत्तर

त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेहनाजचे डोळे बंद असतात आणि मनीष पॉल तिला स्टेजवर असलेल्या प्रत्येक मुलाला हात लावून पर्सनॅलिटी जाणून घेण्यास सांगतो. जेव्हा शेहनाज सिद्धार्थजवळ पोहोचते तेव्हा ती त्याला हात लावून बोलते हा सिद्धार्थ सारखा वाटतो. एवढंच नाही तर जेव्हा शेहनाज सिद्धार्थला पाहते तेव्हा ती आनंदी होते आणि त्याला मीठी मारते.

About admin

अवश्य वाचा

रंगीलाविषयी शेफाली शाहचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री शेफाली शाहने राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या गाजलेल्या चित्रपटाविषयी एक आश्चर्यकारक खुुलासा केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *