२०२१ मध्ये मराठी चित्रपटांची कामगिरी ठरली अभूतपूर्व

२0२0 मध्ये आलेल्या कोरोना काळात चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांचे चित्रिकरणही बंद करण्यात आले होते. लाखो रुपये अडकवून बनविण्यात आलेले चित्रपट अर्ध्यावरच पडून होते. अखेर २०२१ च्या जानेवारीत एक आशेचा किरण दिसला अन् या आजाराचे व्हॅक्सिन काढण्यात सरकारला यश मिळाले. लोकांना व्हॅक्सिन देऊन हळूहळू कामधंदे सुरू करण्यात येऊ लागले. त्यानंतर अनेक चित्रपटांचे चित्रिकरण काही नियम व अटी पाळून संरक्षितरित्या सुरू करण्यात आले. लॉकडाऊनच्या या काळात मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी लोकांना दिली. चित्रपटगृहे उघडली नसली तरी इतर काही माध्यमांद्वारे हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अन् २०२१ मध्ये एकाहून एक सरस चित्रपटांची मेजवानीच प्रेक्षकांना मिळाली.

पीटर – अमोल अरविंद भावे, मनीषा भोर, अमोल पानसरे.
बस्ता – तानाजी घाडगे, सायली संजीव, पार्थ भालेराव.

ओ माय घोस्ट – वसीम खान, प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू.
एक ती – अमर पारखे, विजय कदम, प्रेमा किरण, रुपाली जाधव.

कानभट्ट – अपर्णा एस. होसिंग, भव्य शिंदे, रुग्वेद मुळे, संजीव तांडेल, विपिन बोराटे.
प्रीतम – सिझो रॉकी, प्रणव रावराणे, नक्षत्र मेढेकर, उपेंद्र लिमये, अजित देवळे.

बेफाम – कृष्णा कांबळे, सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले, विद्याधर जोशी.
पेन्शन – पुंडलीलिक वाय., एल. धुमाळ, सोनाली कुलकर्णी, सुमित गुट्टे, निलांबरी खामकर, नारायण जाधव.

हॅशटॅग प्रेम – राजेश जाधव, मिताली मयेकर, सुयश टिळक.
झॉलीवूड – ट्रुशंट इंगळे, अश्विनी लाडेकर, दिनकर गावंडे, काजल रंगारी, अनिल उत्तरवार, आसावरी नायडू.

वेल डन बेबी – प्रियांका तन्वर, पुष्कर जोग, अमृता खानविलकर, वंदना गुप्ते.
शिष्य – चैतन्य ताम्हाणे, आदित्य मोडक, अरुण द्रविड.

जयंती – शैलेश नरवडे, रुतुराज वानखेडे, तितीक्षा तावडे, मिलिंद शिंदे.
झिम्मा – हेमंत ढोमे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी.

गोदावरी – निखिल महाजन, नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, विक्रम गोखले.
पांडू – विजू माने, भालचंद्र कदम आणि कुशल बद्रिके.

 

बळी – विशाल फुरिया, स्वप्नील जोशी, पूजा सावंत, समर्थ जाधव.
डार्लिंग – समीर आशा पाटील, प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, आणि निखिल चव्हाण.

फ्री हिट दणका – सुनील गोविंद मगरे, सोमनाथ अवघडे, अपूर्वा शेलगावकर, तानाजी गलगुंडे आणि अरबाज शेख.
काही वर्षांपूर्वीपर्यंत मराठी चित्रपटांमध्ये तिच ती कॉमेडी पाहून कंटाळलेला प्रेक्षक वर्गाला चित्रपटगृहात खेचण्याकरिता हे चित्रपट कारण ठरले. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटाची धुरा सुभाष घईसारख्या शोमॅनने निसंकोचपणे हाती घेतलेली दिसली. यापूर्वी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक गोष्टीत झगडावे लागत होते. मात्र सध्या अनेक मोठमोठे हिंदी चित्रपट असतानाही मराठी चित्रपटांकरिता प्रेक्षक तिकीटखिडकीवर गर्दी करताना दिसत आहेत. अन् मराठी चित्रपटही तिकीट बारीवर सध्या कोटींची उड्डाणे करत आहेत. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वीपर्यंत गिनतीत नसणारे मराठी चित्रपट सध्या हिंदीबरोबरच हॉलीवूड

चित्रपटांबरोबरही स्पर्धा करत आहेत. टाळेबंदीनंतर फक्त राज्यात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनी केलेली कमाई देशभरात प्रदर्शित होणाºया हिंदी, दाक्षिणात्य सिनेमांच्या तुलनेत लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर अजूनही काही मराठी चित्रपटांची मेजवानीही प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.
– सौ. सारीका प्रवीण पारकर

२ं१्र‘ं.स्रं१‘ं१16@ॅें्र’.ूङ्मे\\

About Sub-Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …