‘हनी ट्रॅप’

हनी ट्रॅप म्हणजे मोहात पाडू शकणाºया किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे. विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. ‘हनी ट्रॅप’ हा प्रकार नवा नाही. याचे काही दाखले आपल्याला पुराणातही मिळतात. महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात ‘हनी ट्रॅप’ लावले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.
प्रत्येक क्षेत्रात अशी उदाहरणे बघायला मिळतात. राजकारण, कॉर्पोरेट, क्रीडा सर्वच क्षेत्रांमध्ये कधी ना कधी याचा वापर होत आला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’चे स्वरूप बदलले आहे. पूर्वी ‘हनी ट्रॅप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते.

अनेकदा प्रत्यक्ष न भेटता त्याला जाळ्यात अडकवले जाते. उदाहरणार्थ न्यूड फोटो पाठवून ते आपले असल्याची खात्री समोरच्याला पटवली जाते. त्याची खात्री पटली की, त्यालाही तसे फोटो पाठवण्यास सांगितले जाते. एखाद्याने हे फोटो पाठवले की, मग तो अलगद या ‘ट्रॅप’मध्ये सापडतो. तिथून मग पैशांची मागणी, गोपनीय माहितीची मागणी अथवा मानसिक छळाला सुरुवात होते. सैन्यदलातील अधिकारी आणि जवानांना यात अडकवून त्यांच्याकडून माहिती मिळवणे हे सातत्याने सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने शस्रास्त्र, क्षेपणास्त्र, सीमेवरील सैनिकांची परिस्थिती, महत्त्वाची मुख्यालये आदींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.
आर्थिक किंवा शारीरिक संबंध अशा गरजांचा अभ्यास करून जवानांना जाळ्यात अडकवले जाते. सदरचा धोका टाळण्यासाठी इंटर्नल चेकच्या माध्यमातून प्रत्येक अधिकारी व जवानाची माहिती संकलित करणे. सायबर सुरक्षिततेसाठी व जवानांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याचेही प्रशिक्षण वारंवार देण्याची आवश्यकता आहे. हल्ली एखादा क्रमांक शोधून त्यावर स्वत:ची जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो.

कुतूहल म्हणून एखाद्याने त्यास प्रतिसाद दिला की, मग गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते. आताच्या जमान्यात कोण कसा ‘ट्रॅप’ लावेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडे चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती पाठवू नका. कुणी सतत मेसेज करत असेल, तर त्याला ब्लॉक करा, अशा प्रकारचे प्रशिक्षण अथवा ब्रेन वॉश सातत्याने केल्यास नक्कीच यात सुधारणा होऊ शकते.
े बाळासाहेब हांडे/ ९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …