ठळक बातम्या

स्कूल चले हम

हा शब्द बºयाच दिवसांनी ऐकल्यावर जरा बावचळल्यासारखे झाले असेल ना! पण आज ना उद्या हे होणे गरजेचे होते. जशा मोठ्या मुलांच्या आॅफलाइन स्कूल चालू झाल्या, तशाच लहान मुलांच्याही चालू करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच आहे, असे पालक आणि शिक्षक यांचे म्हणणे आहे.
लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते, सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे हे त्यांना तितके कळत नाही. म्हणून शाळा नको, सगळ्यांमध्ये मिसळणे नको हे म्हणणे बरोबर नाही, कारण मुलांना पालक इतर सगळीकडे नेतात मग शाळा जर मुलांची व्यवस्थित काळजी घेत असेल, तर पाठवणे सुरक्षित आहे. घरात बसून नुसती मस्ती, टीव्ही बघणे, मारून मुटकुन आॅनलाइन शाळेला बसवणे यापेक्षा मुले शाळेत आली तर सोशल होतात, एकमेकांमध्ये मिसळणे, खेळणे, मैत्री करणे हे शिकतात, कारण या वयातले त्यांचे कोवळं मन या सर्व गोष्टींसाठी तयार होतं, मोल्ड होतं. शिक्षकांचा आदर, त्यांच्याशी संवाद, मित्र-मैत्रिणींबरोबर जेवणे, आपल्या वस्तू शेअर करणे हेही महत्त्वाचे असते, तर शिक्षकांनाही समोर उभे राहून शिकवणे, फळ्यावर शब्द, आकृत्या काढून शिकवणे यात एक वेगळाच आनंद मिळतो. असे पुण्याच्या अभिनव शाळेतील मिसेस गर्दे, संस्कृती शाळेतील मिसेस दीक्षित या शिक्षकांचे मनोगत. मुलांच्या बालसुलभ प्रश्नांना समर्पक आणि समाधान होईपर्यंत उत्तरे देणे त्यांच्या चेहºयावरचे बालसुलभ हाव-भाव टिपणे ही एक शिक्षकांची परीक्षाचे असते; पण त्या परीक्षेला बसण्यात एक वेगळीच मौज असते.

ही शाळेशिवाय कुठे मिळणार सांगा बरं? पण त्यात असेही प्रश्न आहेत की, लहान मुलांचे व्हॅक्सिनेशन झालेले नाही, आता तिसरी लाटही येणार म्हणतात, परवा तर पेपरला बातमी होती की, लहान मुलांमध्ये कोविड झपाट्याने पसरतोय मग हा निर्णय कितपत योग्य?, पण हेही तितकेच खरे आहे की, लहान वयातच आरोग्य, गुणवत्ता पूर्ण शिक्षण आपण आजच्या पिढीला देऊ शकलो, तर खूप गोष्टी देशाच्या दृष्टीने हितावह होतील. गरीब घरची मुले शाळेतच योग्य संस्कार घेऊ शकतील, नाही तर वाम मार्गाला जायची भीती. शाळा मुलांचे मेंदू सकरात्मक दिशेने बदलायला भाग पाडतात. त्यांना भरपूर खेळ, भरपूर कलानुभव उपभोगायला मिळतो. जसा गरीब मुलांसाठी अंगणवाडी हा एक स्तुत्य प्रकल्प आहे. लहान वयातील आरोग्य शिक्षण हे मुलांच्या विकासाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे आहे. आताची परिस्थिती बघता मुले सगळ्यांशी दोन हात करत, स्वत:ला स्ट्रॉग बनवूनच पुढे यायला पाहिजेत. रडत बसून चालणार नाही, उलट असंच म्हणूया ‘हम होंगे कामयाब एक दिन, हो हो मन में हैं विश्वास पुरा हैं विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन.’
– वैशाली वसंत देसाई\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …