सापेक्षता

जीवनाचा प्रवाह हा अखंड वाहत असतो आणि या प्रवाहात अनेक घटनांचे जोड एकामागून एक सतत प्रवाहित होत असतात. या घटनांमध्ये वेगवेगळी ‘पात्र’ येतात, आपापले ‘रोल’ चोख बजावतात आणि पुढे पुढे सरकत सरकत ठरलेल्या वेळी एक्झिट घेतात. पात्रांचे जन्म, त्यांनी केलेली कर्म, त्या कर्मांचे झालेले परिणाम, हे कधी तोडून मोडून, पृथक करून त्यांच्यावर भाष्य करणे, त्याबद्दल जजमेंटल होणे, त्यांना चांगले-वाईट म्हणणे किंवा ठरवणे, हे पूर्णपणे चुकीचे आहे.
‘या जगात, चांगले अथवा वाईट, असे काहीही नाही!’, असे स्वामी विवेकानंद सांगून गेले. हेच सत्य आहे, असे वेगळ्या पद्धतीने मी सांगण्याची गरज नाही. सर्वांनाच ‘अडोल्फ हिटलर’ माहीत आहे. हिटलर जन्माला आला, ही एक घटना. त्याच्या जन्माच्या घटनेमुळे, त्याच्या आईला नक्कीच आनंद झाला असणार. म्हणून या एका घटनेला तोडून ‘चांगले’ म्हणायचे का?, त्यानंतर हिटलरच्या हातून जो अमानुष नरसंहार झाला, त्या घटनेला तोडून ‘वाईट’ म्हणायचे का? आणि आता चालू काळात, जर यदाकदाचित या त्याच्या हातून घडलेल्या अमानुष कृत्यातून ‘बोध’ घेऊन संपूर्ण जगाने युद्ध, हत्या न करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले, तर या घटनेला तोडून, पुन्हा ‘चांगले’ म्हणायचे का?, तेव्हा जीवनाच्या प्रवाहात घडणाºया घटनांचे असे तुकडे करून, त्यांना चांगले अथवा वाईट म्हणणे आणि तशी ‘लेबले’ चिकटवत बसणे चुकीचे ठरेल.

चांगले अथवा वाईट, हे ‘काल-सापेक्ष’ आणि ‘व्यक्ती-सापेक्ष’ आहे. इट व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड इट व्हेरीज फ्रॉम टाईम टू टाईम. यात ‘शास्वत’ काहीच नाही. सतत बदलत जाणाºया कशालाही कायमची लेबले लावणे, ही मुढता आहे. दुसºया एका अर्थाने सुद्धा चांगले-वाईट हा प्रकार चुकीचाच आहे, कारण ही दोन विशेषणे आपण, सामान्यत: ‘कृत्याला’ लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी, आपण अथवा कोणीही ‘व्यक्ती’ काही कृत्य करू शकते हीच मुळात एक ‘भ्रांती’ आहे.
चंद्रशेखर खेर/ ९१३७४६४२९३\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …