सहाय्यक केंद्र अधिकारी ते सिडको मुख्य अग्निशमन अधिकारी

जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम व स्वत:वरील दांडगा आत्मविश्वास हीच यशाची गुरूकिल्ली.
मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागात १२ डिसेंबर १९९५ साली नियुक्त झालेले विजय शांताराम राणे यांना सिडको महामंडळात १ नोव्हेंबर २०२१पासून मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.

एक सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती. वडील मिल कामगार. १६० चौ. फूट खोलीत राहणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने व मेहनतीने मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर स्थानापन्न झाली. ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. हा प्रवास निश्‍िचतच सोप्पा/सहज नव्हता. विजय राणे मुंबई अग्निशमन दलात १२ डिसेंबर १९९५ साली सहाय्यक केंद्र अधिकारी या पदावर नियुक्त झाले. एकूण २४ उमेदवार असलेल्या या तुकडीत ६ व्या क्रमांकावर ज्येष्ठता यादीत असलेला हा उमेदवार सुरुवातीपासूनच धडपड्या वृत्तीचा, ज्या क्षेत्रात आलो त्या क्षेत्रात सर्वोच्च पोहचण्याचे हे सुरुवातीला निश्‍िचत होते.
मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असताना या ठिकाणी वार्षिक अग्निकवायत स्पर्धा घेण्यात येत असत, तसेच महाराष्ट्र शासनामार्फत टेक्निकल मिडली फायर अ‍ॅडव्हायझर ड्रील या अग्निकवायत स्पर्धा घेण्यात येत असत. या अग्निकवायत स्पर्धेत १९९६ पासून २००७ पर्यंत या कालावधीत मुंबई अग्निशमन दलाच्या वार्षिक अग्निकवायत स्पर्धा व महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबई अग्निशमन दलाच्या या स्पर्धेकरिता अधिकारी म्हणून धुरा सांभाळली व एकूण १७ पारितोषिके त्यांनी पटकाविली. यावेळी त्यांना तत्कालीन अधिकारी किरण कदम (मा. मुख्य अग्निशमन अधिकारी), एस. एल. देसाई यांचे मार्गदर्शन उत्तम लाभले.

राणे नावाची उत्कृष्ट अधिकारी म्हणून ओळख झाली, मात्र या अधिका‍ºयाने सहाय्यक केंद्र अधिकारी यांना ८ तास ड्युटी असल्याचा फायदा घेत नोकरीत रुजू झाल्यावर एलएलबी पदवी २००१मध्ये प्राप्त केली. याचवेळी वर्ष २००१ मध्ये जीआय फायर (ई) इंडिया ही अग्निशमन विभागातील तांत्रिक पदवी देखील प्राप्त केली. यानंतर वर्ष २००६मध्ये अ‍ॅडव्हॉन्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी ही पदवी सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट या नामांकित संस्थेतून प्राप्त केली. वर्ष २००७ मध्ये एमझेड फायर (ई) यू.के. ही अग्निशमन विभागातील पदवी प्राप्त केली.
१९९५ पासून वर्ष २००७ पर्यंत पदोन्नतीच्या १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पदोन्नती न मिळत असल्याचे समजून आल्यावर २००७ मध्ये मुंबई महानगरपालिकेतील आपल्या सहाय्यक केंद्र अधिकारी या पदाचा राजीनामा देऊन नवी मुंबई महानगरपालिकेत ३ मे २००७ रोजी केंद्र अधिकारी या पदावर रुजू झाले.

केंद्र अधिकारी या पदावर रुजू होताना यापूर्वी त्यांना मिळणारे वेतन रक्कम रुपये १८००० वरून १२००० इतक्या वेतनावर म्हणजे ६०००रुपये कमी वेतनावर नवी मुंबई महानगरपालिकेत केंद्र अधिकारी या पदावर रुजू झाले. नवी मुंबई महापालिकेत रुजू झाल्यावर तत्कालीन अग्निशमन अधिकारी रोहिदास म्हात्रे व उपायुक्त सिन्नरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय स्वरुपाची कामे पार पाडत गेले.
मे २००८ मध्ये म्हात्रे हे विहित वयोमानानुसार निवृत्त झाल्यावर नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाचा कार्यभार माहे २००८ पासून सांभाळताना वरिष्ठ पदावर असूनदेखील जवळपास प्रत्येक आगीवर स्वत: पुढाकार घेऊन काम करत होते. वर्ष २००९ मध्ये राणे यांनी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथून प्रगत पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचदरम्यान अग्निशमन विभागाकरिता आवश्यक असलेलली नायट्रॅलीक प्लॅटफॉर्म ७०मीटर उंचीपर्यंत फायर फायटिंग करू शकणारे वाहन दलाकरिता खरेदी केले. राणे यांच्या कामाची दखल घेत तत्कालीन अग्निशमन सेवा संचालक मिलिंद देशमुख यांनी मा. आयुक्त यांना विजय राणे यांना लंडन फायर सर्व्हिस कॉलेज येथे पाठविण्याासाठी कळविले व यानुसार मार्च २०११ मध्ये संपूर्ण देशात एकूण ३० अग्निशमन अधिकारी यांना लंडन फायर सर्व्हिस कॉलेज येथे टीओटी ए अर्बन सर्च अ‍ॅण्ड रिसर्च या प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आलेल्या पैकी महाराष्ट्रातील ५ अग्निशमन अधिका‍ºयांमधून राणे यांना पाठविण्यात आले होते.

नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाची धुरा सांभाळताना विभाग अत्याधुनिक कसा करता येईल व उपलब्ध असलेले मनुष्यबळ कसे वाढविता येईल या अनुषंगाने सतत प्रयत्न व पाठपुरावा करत राहिले व महानगरपालिकेकरिता एकूण ५६ मंजूर पदाव्यतिरिक्त ४१९ पदे नव्याने निर्मिती करून एकूण ४७५ पदे यांची मंजुरी मिळविली. तसेच वाशी, सीबीडी, कोपरखैरणे, नेरुळ या ठिकाणी अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारली. तसेच नेरुळ येथे वर्ष २०१२ मध्ये अग्निशमन केंद्र उभारल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन संचलनालय यांचे मार्फत घेण्यात येणा‍ºया अग्निशमन या पाठ्यक्रमाच्या उमेदवारांचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. दरम्यानच्या काळात वर्ष २०१६ मध्ये एमबीए पाठ्यक्रमदेखील पूर्ण केला.
वर्ष २०१६ मध्ये राणे यांना सिडको महामंडळात उप मुख्य अग्निशमन या पदावर नेमणूक मिळण्याची संधी प्राप्त होताच मार्च २०१६ मध्ये सिडको महामंडळाच्या अग्निशमन विभागात उपमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर ते रुजू झाले. दरम्यानच्या कालावधीत १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महानगरपालिका नव्याने स्थापन झाली व मा. राज्य शासनाच्या मान्यतेने राणे यांच्याकडे वर्ष २०१७ आॅगस्टमध्ये येथील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. यापूर्वी महापालिकेत काम केल्याचा अनुभव असल्याने पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकरिता आवश्यक असलेले मनुष्यबळ एकूण २०८ पदांची मंजुरी मिळविण्याकरिता सादर केलेल्या प्रस्तावानुसार २०४ पदांकरिता मा. राज्य सरकारची मान्यता मिळाली. या ठिकाणी एकूण आवश्यक असलेली अग्निशमन केंद्र, मनुष्यबळ, वाहने याकरिता महापालिकेकडे प्रस्ताव सादर केले.

वर्ष २०२१ आॅक्टोबरमध्ये सिडको महामंडळाकडील मुख्य अग्निशमन अधिकारी हे विहित वयोमानानुसार निवृत्त झाल्यावर १ नोव्हेंबर २०२१ रोजी सिडको महामंडळाच्या अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा पदभार राणे यांच्याकडे सोपविण्यात आला.
अग्निशमन सेवेतील २५ वर्षांच्या अथक परिश्रम व खडतर सेवेनंतर एक मिल कामगार यांचे सुपूत्र यांनी आपल्या मेहनतीने व आपल्या कर्तृत्वाने मुख्य अग्निशमन या पदावर कार्यरत होणे नक्कीच स्पृहनिय आहे.

– अरविंद पोतदार

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …