ठळक बातम्या

शोधा-शोध


गरज ही शोधाची जननी आहे, बरोबर?, पण अशी गरज तर सर्वांना असते?; पण शोध मात्र एखादाच लावतो. असे का? तर त्यामागची शोध लावणाºयाची वैचारिक परिपक्वता महत्त्वाची असते. युरेका युरेका म्हणत आर्किमिडीज आंघोळ करता करता नागडाच राजाकडे दरबारात पळत सुटला, कारण त्याला डेन्सिटी म्हणजे घनतेचा शोध लागला होता आणि त्याची व्याप्ती काय आहे हे समजविण्यासाठी तो उतावीळ होऊन पळत राजाकडे गेला.

जगातील ९९ टक्के शोध हे अपघाताने लागले आहेत. अमुक एक शोध लावायचा आहे, म्हणून प्रयत्न करून तोच शोध लागला, असे क्वचितच झाले आहे. रासायनिक वैज्ञानिकांची तर त‍ºहाच और, जाते थे जपान, पहुंच गये चीन, समझ गये ना। अशी काहीशी गत त्यांच्या बाबतीत झालेली आहे. नक्की काय करायचे हेच बहुतेकांना माहीत नव्हते, त्यांच्या डोक्यात अमुक एक रसायन बनवायचे असे काही विचार नव्हतेच, उलट प्रयोगशाळेत काही तरी उपद्व्याप करतानाच त्यांना अचानक शोध लागले आहेत.
मादाम क्युरी महान शास्त्रज्ञ या जगातील एकमेव स्त्री वैज्ञानिक आहेत, ज्यांना दोनदा रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांना प्रथम रेडियम या धातूचा शोध लागला, अर्थात तो ही अपघातानेच. युरेनियम खनिजातून पूर्ण युरेनियम काढल्यावर सुद्धा, त्यातून क्ष किरण निघत असल्याचे त्यांना कळले, म्हणजे अजून एकदा धातू त्यात आहे, हे समजून त्यांनी त्यावर प्रयोग केले ज्यातून रेडियम धातू जगासमोर आला.

अहो, कोलंबससुद्धा भारताचा शोध लावण्यासाठी बाहेर पडला व अमेरिकेचा शोध लावून बसला. अलेक्झांडर फ्लेमिंगना पेनिसिलिनचा शोध अपघातानेच लागला. काही ठरवून घडले नाही, तो अत्यंत वेंधळा लॅब असिस्टंट होता. त्याच्या हातून एक चूक घडली व जगासमोर पेनिसिलिन आले. विजेचा शोध सुद्धा मायकल फेराडेला असाच अपघाताने लागला.
जगात कोणीही महान शास्त्रज्ञ वगैरे ठरवून झाले नाहीत, अनेक वेळेस त्यांच्या हातून चुकाच घडत गेल्या, त्याची कारणे शोधताना त्यांना अकल्पित शोध लागले व ते महान शास्त्रज्ञ म्हणून जगासमोर नावारूपास आले.

पर्सी पेंसर रडारवर काम करत होता, तेव्हा त्याच्या खिशातील चॉकलेट बार वितळू लागला, आणि अपघाताने घरोघरी वापरात येणारा मायक्रोवेव्ह ओवनचा शोध लागला.
रॉय प्लूकेटला नॉन स्टिकचा असाच अपघाताने शोध लागला, ज्याचा वापर आपण स्वयंपाकाच्या तव्यामध्ये वापरतो. जॉन वॉलकरला काडेपेटीतील काडीचा असाच उचापती करताना शोध लागला. सचरिन, स्क्रोच गार्डचा शोध ही केवळ अपघातानेच लागला आहे.

वैद्यक शास्त्रात अमुलाग्र क्रांती घडवणाºया क्ष किरणांचा अर्थात एक्स रेचा शोध ही विल्हेम रोहनटेनला असेच काहीतरी विचित्र करताना लागला. या न लक्षात येणाºया किरणांना त्याने एक्स रे असे नामकरण केले.
आइनस्टाइनना एकदा विचारले होते, तुम्हाला हे सर्व सुचले कसे, त्यांनी उत्तर दिले, माझ्यातील बाल बुद्धी अजून तशीच आहे. त्यातून मला प्रश्न पडतात व उत्तरे शोधण्याची जिज्ञासा राहते. चांगला वैज्ञानिक बनण्यासाठी तुमची निरीक्षण शक्ती तिक्ष्ण असायला हवी, अँनोलॉजी म्हणजे समानता लावता आली पाहिजे, आजूबाजूला होणारे सूक्ष्म बदल लक्षात आले पाहिजेत, घडलेल्या बदलाचा आपल्या जीवनात योग्य वापर कसा करता येईल हे समजायला हवे. फ्लेमिंगला समजले पेनिसिलिन नावाची बुरशी जीवाणूंना अर्थात बॅक्टेरियाला मारते, ही बाब लक्षात आल्यावर, त्याने माणसांना रोग पसरवणाºया जीवाणूंना त्याचा वापर करून मारता येईल याची समानता शोधली आणि अँटी बायोटिक्सचा उदय झाला. दर दिवशी नवनवीन शोध लागत राहतात, थोडा प्रयत्न तुम्ही पण करून पहा, कदाचित तुमचे नाव ही भावी वैज्ञानिकांच्या यादीत येऊ शकते.

विजय लिमये/9326040204\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …