शिशू दुग्ध विकल्प अधिनियम

स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी मनुष्याला योग्य पर्याप्त व पोषक आहाराची आवश्यकता असते. संतुलित पोषक आहार हा मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग अगदी जन्म झाल्यापासूनच मनुष्यास पोषक आहाराची आवश्यकता असते, जसे बाळ जन्माला येते, तसे पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाची वाढ होण्यास त्याला सुरक्षित, संतुलित व पौष्टिक आहाराची गरज असते आणि हा आहार बाळाला आईच्या दुधातूनच मिळू शकतो. आईचे दूध हेच बाळासाठी पूर्ण अन्न आहे, ते आदर्श आहार व पचनास सोपे आहे व त्यानंतर दोन वर्षांपर्यंतचे वय हे बाळाच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्य व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते. हा सर्व विचार करून शिशू दुग्ध विकल्प अधिनियम १९९२ मध्ये तयार करण्यात आला व १९९३ मध्ये अंमलात आणला गेला. त्यानंतर या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेत २००२ मध्ये बिल मांडण्यात आले. २००३ मध्ये ते पास झाले व २००४ पासून अंमलात आले. जन्मापासून सुरुवातीचे सहा महिने बाळासाठी आईचेच दूध अनिवार्य आहे, तसेच सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतच्या बाळांना पूरक आहार देणे आवश्यक आहे, परंतु बाजारात मिळणाºया डबाबंद शिशू आहार आईच्या दुधाइतका पोषक असल्याचा दावा केला जातो. त्याचा प्रचार-प्रसार केला जातो. जाहिराती केल्या जातात, परंतु दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांना असा आहार देणे चुकीचे आहे. आईच्या दुधास पर्याय म्हणून कोणत्याही डबाबंद शिशू आहार किंवा त्यांचे उत्पादन वितरण व प्रचार करू शकत नाही. व्यावसायिक जाहिराती आईच्या दुधाचे महत्त्व कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. परंतु हा कायदा त्यास प्रतिबंधीत करतो. या कायद्याचे फायदे असे आहेत की, बाळाच्या मानसिक व शारीरिक वाढीस प्रोत्साहन मिळते. बाळाला चांगल्या शिक्षणासाठी तयार करणे, अ‍ॅलर्जी, दमासारख्या संक्रमणांपासून बाळाचे संरक्षण होते. कुपोषण कमी करण्यास या कायद्यामुळे मदत होते व पाच वर्षांखालील मुलांचे मृत्यू दर कमी होण्यासही मदत होते. प्रतिकारकशक्ती, बुद्धिमत्ता वाढते. या कायद्याचा उद्देश आहे की डबाबंद शिशू पदार्थांचा वापर प्रतिबंधित व नियंत्रित करणे आरोग्य संस्था, आरोग्य कर्मचाºयांच्या भूमिका आणि जबाबदाºया परिभाषीत करणे. पहिले सहा महिने आईचे दूध किती महत्त्वाचे आहे. याबाबत मातांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे हा अधिनियम बाळांच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी तसेच शारीरिक व मानसिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

अ‍ॅड. सोनल योगेश खेर्डेकर/ कायद्याचे राज्य

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …