विविधतेत एकता


भारताला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील चालीरिती, धर्म, परंपरा, भाषा वेगवेगळ्या असल्या, तरी भारत एकच आहे, असे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत म्हणजे कोट्यवधी लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा यांची सामूहिक शक्ती आहे. राज्य अनेक मात्र देश एक, समाज अनेक भाव एक, पंथ अनेक ध्येय एक, आशा अनेक पण अभिव्यक्ती एक, रंग अनेक तिरंगा एक. समाज म्हणजे केवळ लोकांचा समूह नव्हे, तर जीवनातील प्रत्येक व्यक्तीचा आपसातील असलेला संबंध म्हणजे समाज होय. ज्यावेळी विविध मानवसमाज एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतात, त्यावेळी त्या ठिकाणी सुख नांदत राहते. विविधतेत एकता हा फक्त एक वाक्प्रचार नाही, तर भारताच्या एकतेची ही जणू व्याख्याच आहे. अनेक वर्षांपासून भारतामध्ये विविध जाती, धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ज्याप्रमाणे विविध रंगांचे धागे एकत्र आल्यानंतर एक छान रंगीत वस्त्र तयार होते, अगदी त्याचप्रमाणे भारतामध्ये अनेक जाती, धर्मांचे विविध रंगी लोक एकत्र मिळून मिसळून राहतात.
भारतामध्ये भाषावार प्रांतरचना झाली. त्यानंतर प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा अस्तित्वात आली. भाषेबरोबरच प्रत्येक प्रांतातील, राज्यातील सण, समारंभ, धार्मिक कार्य यामध्ये देखील विविधता निर्माण झालेली, तर आहेच. दीपावली, पोंगल, गरबा यांसारखे भव्यदिव्य सण, भरत नाट्यम, रास, कथक यांसारखे नृत्य प्रकार आपल्याला भारतात बघायला मिळतात. हे असे विविध प्रकारचे सण-उत्सव, नृत्य प्रकार, खेळ असले तरी देखील कोणत्याही राज्यातील खेळाडू किंवा व्यक्ती इतर कोणत्याही राज्यातील सण-समारंभ, खेळ, नृत्यप्रकार अगदी आनंदाने खेळताना व साजरे करताना दिसतात. हेदेखील राष्ट्रीय एकतेचे उदाहरण म्हणता येईल. भारत हा विविधतेत एकता असलेला सर्व देशांपैकी अनोखा देश आहे. विविध धर्म, जात, भाषा, पंथ असूनही भारताच्या संस्कृतीत कधीही कमतरता जाणवलेली नाही.
भारतातील सर्वजण मिळून मिसळून विविध सण, उत्सव साजरे करून देशाची एकात्मता टिकवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. यामुळे येथे विविध परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण झाले आहे. भारतीय समाज सर्व समावेशक आणि लवचिक आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही रंगांचे खाद्यपदार्थ सेवन केले, तरी रक्त हे लालच असते. त्याप्रमाणे आपल्या समाजात विविधतेतून एकता दिसते. प्रादेशिक, धार्मिक, भाषिक, जातीय विविधता हे एकतेचे सूत्र गुंतागुंतीचे असले, तरी त्यात छेदात्मक एकता आहे.
अनेक आक्रमणे झाली, तरी संस्कृती, श्रद्धा, परंपरा जपल्या गेल्या आहेत, बहुरंगी, बहुढंगी असा आपला समाज दिसत असला, तरी तो परस्परांशी जोडला गेलेला आहे. याचा प्रत्यय आपल्याला इतर देशांशी क्रीडा स्पर्धा खेळताना दिसून येतो. बाह्य शत्रूंनी आक्रमण केल्यानंतर आपण ते एकजुटीने परतून लावतो. अशावेळी खरोखर आपल्याला आपल्या एकतेचा अभिमान वाटतो. विविधतेत एकता हे पूर्वीपासून भारतीय समाजाच एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जे आपल्याला १८५७च्या उठावात प्रकर्षाने दिसून आले. व्यापाºयांच्या वेशात भारत देश लुटण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी जेव्हा देशावर कब्जा करायला सुरुवात केली, तेव्हा विविध धर्मांच्या संस्थानिकांनी इंग्रजांविरोधात पुकारलेले बंड म्हणजे १८५७चा उठाव. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवे, कुवरसिंह हे हजारो लोकांना सोबत घेऊन ब्रिटिशांविरोधात लढले. या लढ्याच नेतृत्व तेव्हाचे दिल्लीचे बादशहा बहादूरशहा जफर यांनी केले. यातून आपल्याला असे दिसते की, आतल्या आत आपल्यात मतभेद असले, तरी परकीयांसाठी एकजुटीचे बळ असते. हीच खरी एकता आहे.
े बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …