वंदू तुळशी माऊली…!

‘पंढरपुरात गर्दी झाली चंद्रभागेत,
विठू सावळा गळा तुळशीमाळा नाचे,

साधू संतात…!’
तुळस कृष्णसखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच. वारकरी संप्रदायात तुळशीला अत्यंत महत्त्व आहे. वारी ‘आषाढी’ची असो वा ‘कार्तिकी’ची भक्तगण अखंड नामस्मरण करत या ‘हरिप्रिया’ तुळशीला डोक्यावर घेऊन नाचत असतात. वारीत लाखो भाविकांच्या मस्तकांवर तुळस विराजमान झालेली असते.

सर्वप्रथम ‘मुंबई चौफेर’च्या सर्व वाचकांना ‘तुळशी-विवाहा’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!
जसे शंकराला बेल, गणपतीला जास्वंद, दुर्वा, लक्ष्मीला कमळ तसे बिष्णूला तुळस प्रिय असते.

भारतात आजही अशी एकही व्यक्ती नाही की, ज्या व्यक्तीला तुळस माहिती नाही. अगदी लहान-मोठ्यांपासून सर्वांनाच तुळशीबद्दल संपूर्ण माहिती आहे. आजही सर्वच महिला मिळेल तिथे एक तरी तुळशीचे छोटे-मोठे रोप लावत असतातं. आजच्या काळात तुळशीसुद्धा एक ट्रेंडिंग वनस्पती बनली आहे. सगळेच डायटीशियन, प्रसिद्ध शेफ, सेलिब्रिटी, फुड काऊन्सलर सगळेच तुळशीचा आपल्या प्रत्येक डिशमध्ये वापर करताना दिसत आहेत. आपल्या आरोग्यासाठी तुळशी किती महत्त्वाची आहे, हे आता पाश्चात्य लोकसुद्धा मान्य करत आहेत.
हिंदू धर्मामध्ये तुळशीचे स्थान उच्च आहे. तुळशीची पूजा मनापासून केली जाते. ज्या घरासमोर तुळस आहे व ती तुळस हिरवीगार आहे, त्यांच्या घरी धन, धान्य कधीही कमी पडत नाही, असे आजही मानले जात आहे. कारण, तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा येतो, तसेच तुळशी श्रीमंत बनवते. ज्या घरामध्ये दररोज आंघोळ केल्यानंतर तुळशीची पूजा केली जाते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा सदैव असते. साधारण सकाळच्या वेळी महिला तुळशीला प्रदक्षिणा घालतात, पूजा करतात. त्यावेळी ओझोन बाहेर पडत असतो. (त्या काळात महिलांना घराबाहेर मॉर्निंग वॉकला जाण्याची पद्धत नव्हती.)

महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने तुळशीच्या सान्निध्यात जर सकाळचा काही वेळ घालवला, तर त्यांचे आरोग्य चांगले राहते व त्यामुळे कुटुंबाचेसुद्धा आरोग्य त्यांच्यामुळे चांगले राहते. तुळशीच्या पानातून ओझोन हा वायू बाहेर पडत असतो. या वायूमुळे मन नेहमी प्रसन्न व आनंदी राहते. आयुर्वेदात तुळशीचे अनेक उपयोग सांगितले आहेत. तिच्यामध्ये जीवाणुरोधी, दाहशामक, तसेच अधिहर्षतारोधी गुणधर्म आहेत. कफनाशक असल्यामुळे ठसका व खोकला यांवर तुळशी उपयुक्त आहे. तुळशीचा काढा मुलांच्या पोटाच्या विकारांवर उपयुक्त असतो. तिच्या पानांपासून उर्ध्वपातन करून तेल मिळते. हे तेल पिवळे, किंचित लवंगाच्या वासाचे व बाष्पनशील असते. सौंदर्यप्रसाधनांत हे तेल वापरले जाते. डास प्रतिकर्षण करणाºया मलमांमध्ये तुळशीचा वापर करतात. तिच्या पानांमध्ये ओलिअ‍ॅनिक आम्ल, उर्सोनिक आम्ल, रोझमॅरिनिक आम्ल, युगेनॉल, कार्वोकॉल, लिनॅलूल, कॅरियोफायलीन व एलिमीन हे घटक असतात. काही संशोधनातून रक्तशर्करा कमी करण्यासाठी, तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरू शकते, असे सुद्धा आढळले आहे.
वैद्य दातारशास्त्री नेहमी सर्दी-खोकल्याच्या रुग्णांना सोप्पा उपाय सांगत असे. तुळशीचे पानं हे सर्वात नैसर्गिक व उत्तम औषध आहे. आजही कित्येक मोठ्या आजारांवर देखील तुळशीपासूनच बनवलेले औषध दिले जाते. तुळशीची फक्त पानेच गुणकारी नसून, फुलेही तितकीच बहुगुणी आहेत. तुळशीच्या अंगी आजही विशिष्ट शक्ती आहे.

ज्या व्यक्तींच्या घरी तुळस आहे, ते घर आजही तिर्थक्षेत्रासारखे पवित्र आहे.
‘तुळशी ग माता तू पतिव्रता माझ्या अंगणात,

घालते पाणी लागू दे चरणी पुरवी मनोरथ!’
– आकाश दीपक महालपूरे/7588397772\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …