लसीकरणाची अट

कोरोनाविरुद्ध लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत लसीकरणाचे दोन डोस घेणे अनिवार्य केले आहेत. दोन डोस न घेतलेल्या कर्मचाºयांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाºयांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. विभाग प्रमुखांनी याची खातरजमा करून अहवाल सादर करावा. ३० नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात किमान पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना देखील विविध बंधनांना सामोरे जावे लागणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी, तर लसीकरण नाही तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही. मॉल, शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयात प्रवेश नाही. सवलत, लाभ, योजना, सहभागासाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाºया कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहेत, याची खात्री करावी. जनतेशी संपर्क येणाºया प्रत्येक विभागाच्या कर्मचाºयांचे लसीकरण १००% झालेच पाहिजे. रांगा लावून लसीकरण करून घेणारे, लस मिळत नाही म्हणून आरडाओरडा करणारे या सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर, आता लसीकरण केंद्रे ओस पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही लोकांच्या मनात शंका आहे. कारण दहा महिन्यांत लस तयार झालीय. मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत लसींना परवानगी तर मिळाली नाही ना, मग ‘रोग नको पण उपचार आवर’ म्हणण्याची वेळ लोकांवर येईल, अशी भीती लोकांना वाटते. कोरोनाच्या लसीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथक पसरली आहेत.

काही मुस्लीम विद्वानांनी, कोविड लसीमध्ये डुकराचं मांस मिसळलं असल्यामुळे मुसलमानांनी लस घेऊ नये, असं सांगितलं होतं. बरेच लोक काही दिवस दारू पिता येणार नाही, म्हणून आजही कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करताना दिसतायेत. लस घेतल्यानंतर जीव जाईल, कोविडची लागण होईल, अशी भीती काही लोकांमध्ये आहे. विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिला डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. कोरोनाची साथ अजून गेलेली नाही. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून, अशांच्या जीवाला कमी धोका आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरांतील व धर्मातील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करून जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. थोडक्यात साम-दाम-दंड-भेद या सर्व उपाययोजनांचा उपयोग करून लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात यावे. यामुळे लोकांच्या जीवनाची सुरक्षितता व राज्याला आर्थिक गती प्राप्त होईल.

– बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …