लसीकरणाचा दुसरा डोस न घेणाºयांवर आता कारवाई?

ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. कारण मुंबईतील धरावीमध्ये या विषाणूचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करून लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा. जे नागरिक दुसºया डोससाठी पात्र आहेत, परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी १५ डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा. अन्यथा शासकीय पर्याय वापरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, दौंड, पुरंदर आणि बारामती या चार तालुक्यांत डोसचे प्रमाण एकदम कमी आहे.
या चार तालुक्यांतील दुसºया डोसचे लसीकरण वाढवण्यास प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु पुढच्या आठवड्यात या चार तालुक्यांतील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला, तर पुढील आठवड्यापासून आम्ही कठोर निर्णय घेणार असल्याचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. असा इशारा नागरिकांना देण्याची वेळ का आली आहे?, खरेतर एखादी लस ९४ टक्के प्रभावी असेल, तर पहिला डोस घेतल्यानंतर ६० टक्के प्रभावी ठरते.

दुसरा डोस घेतल्यानंतर लशीचा पूर्ण प्रभाव दिसून येतो. दुसरा डोस घेतलाच नाही, तर पहिल्या लसीने जो काही प्रभाव निर्माण झाला आहे, तोही अल्पकाळ टिकतो, म्हणूनच दुसरा डोस घेणं आवश्यक आहे. असे मार्गदर्शक सांगतात. कोरोनाचा दुसरा डोस न घेण्याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. लसीकरण करणं हे ऐच्छिक आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लस अनिवार्य नसून, ऐच्छिक आहे. लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या व्यक्तींमध्ये कोणताही फरक नाही. कोरोना लसीमुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं, अशी एक समजूत भारतातच नाही, तर जगभरात पसरली आहे.
गरोदर महिलांना सध्या देशात लस देण्यात येत नाही; पण लस घेतल्यास अशा महिलांचा गर्भपात होण्याची शक्यता वर्तवणाºया अफवा चर्चेत राहिलेल्या आहेत. भारतातील काही मुस्लीम विद्वानांनी, कोव्हिड लसींमध्ये डुकराचं मांस मिसळलं असल्यामुळे मुसलमानांनी लस घेऊ नये, असं सांगितलं होतं; मात्र भारतातील दोन्ही लसींमध्ये डुकरांचं मांस मिसळलेलं नाही, हे सत्य आहे. लसीमध्ये एक चिप लावलेली असून, त्याद्वारे तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवलं जाईल, असा दावा फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल झाला होता; मात्र अशा प्रकारची कोणतीही चिप लसीमध्ये नाही. दारू पिता येणार नाही, म्हणून आजही बरेच जण कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करताना दिसतायेत.

कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक लोक रक्तात गुठळी होऊन हृदयरोगाने मृत्यू पावले आहेत, असे म्हणतात. जगभरात कोरोना व्हायरसचे नवे म्युटंट येत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लस म्युटंट व्हरायटीविरोधात किती सक्षम आहे, असे प्रश्नही उपस्थित होत आहे. आज आपण घेतलेली लस नव्या विषाणूंसाठी प्रभावी असेलच असे नाही, असा विचार करतात. काही जण बेफिकिरीमुळे लस घेत नाहीत, तर काही लोक तर लसीसाठी नोंदणी केलेली असूनही प्रत्यक्षात लस घ्यायला जातच नाहीत. काही लोक विचारतात की, दुसरा डोस नाहीच घेतला, तर काय नुकसान होणार आहे? दुसरा डोस घेतला नाही, तर नेमकं काय होईल, याबद्दल आता पुरेसं संशोधन झालेलं नाही. सध्या संशोधनाचा प्राधान्यक्रम फक्त अधिकाधिक लोकांना सुरक्षितता प्रदान करणं हाच आहे. सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी लसीकरणाचे टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे.
-े बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …