मोक्षकाष्ठ

भारत हा शेतीप्रधान देश आहे, इथे विविध प्रांतात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. ज्यातून शेतकºयांचा उदरनिर्वाह होतो.
जे पीक शेतकरी घेतात, त्यातील साधारण पंचवीस टक्के हिस्सा मनुष्यास खाण्यास उपयुक्त असतो. जवळपास चाळीस टक्के भाग जनावरांचा चारा म्हणून उपयोगात येतो. उरलेला पस्तीस टक्के भाग कोणत्याही प्राण्यांना उपयोगात येत नाही, त्याला शेतकरी तुराटी, पराटी, धाटे, सड अशा विविध नावांनी ओळखतात.

हा शेत कचरा बहुतांशी शेतकरी शेतात आग लावून पेटवतात. हे दृश्य आपल्याला रस्त्याने जाताना नेहमीच दिसते. ते पेटवण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की, शेतकचरा नष्ट करणे, या नंतर नवीन पीक घेण्यासाठी शेताची मशागत करणे सोपे होते.
ही पद्धत भारतातील सर्व प्रांतात कमी अधिक प्रमाणात सारखीच अवलंबली जाते. याचे फार गंभीर परिणाम दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब येथील शहरी जनतेला भोगावे लागतात. हे आपण बातम्यात पाहतो, यामुळे प्रदूषणाची मात्रा सहन करण्यापलीकडे पोहोचते.

शेतकरी या कृतीने दोन प्रकारे नुकसान करतात, प्रथम अशी आग लावल्यामुळे शेतातील गांडुळे ज्यांना शेतकरी मित्र म्हणतात, होरपळून मरतात, ज्यामुळे पिकाला त्यांची मदत होत नाही. दुसरे असे की शेत कचरा बहुमूल्य इंधन आहे, जो अशा तºहेने विनाउपयोग नष्ट होते.
आम्ही या कचºयातून उत्कृष्ट प्रकारच्या विटा बनविल्या ज्याला मोक्षकाष्ठ, असे नाव दिले आहे. याचा वापर स्मशान घाटावर दहन विधीसाठी करून लाकडांच्या वापरावर आळा बसविण्यास मदत केली आहे. यामुळे आम्ही वृक्ष संवर्धन करण्यास बहुमूल्य योगदान देत आहोत.

नागपूर शहराने ही पद्धत साधारण पाच वर्षांपूर्वी अंबाझरी घाटावर सुरू केली. त्याला लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. नोव्हेंबर २०२१ अखेरपर्यंत १७ हजारांपेक्षा जास्त लोकांचे मोक्षकाष्ठ वापरून दहन करण्यात आले. यामुळे आम्ही ३४ हजारांपेक्षा जास्त झाडांना जीवदान मिळवून दिले आहे.
एक मृतदेह, लाकडांचा वापर करून दहन केल्यास पंधरा वर्षे वयाच्या दोन झाडांना कायमचे मुकावे लागते. ही निसर्गाची न भरून निघणारी हानी आहे. हे पटत असूनही भारतीय समाज दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव लाकूड वापरून प्रिय व्यक्तीचे दहन करतो.

आम्ही हा सक्षम पर्याय देऊ शकलो, ज्याचा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. या कृतीमुळे शेतकºयांचा आर्थिक लाभ होऊ लागला आहे. शेतातील गांडुळे वाचल्यामुळे शेतीसाठी त्यांचा उपयोग होऊ लागला आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमुळे दोन झाडांची होणारी हानी टळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची पातळी घटण्यास मदत होत आहे. हे इंधन सुकलेले असल्यामुळे, कमी इंधनात सुद्धा दहन विधी पूर्ण होतो. ज्यामुळे नगरपालिकेला किंवा नातेवाईकांना कमी खर्च लागतो.
सनातन धर्मात पर्यावरण संरक्षण करण्यावर खूप भर दिला गेला आहे, परंतु आजपर्यंत कळत न कळत आपण माहीत असूनही केवळ चांगला पर्याय नसल्यामुळे लाकूड दहन करत आलो आहोत आणि पर्यावरणाची न भरून निघणारी हानी करत आहोत. याचा पर्याय म्हणजे मोक्षकाष्ठ ज्याचा वापर सुरू झाल्यामुळे मृतत्म्यास मोक्ष मिळण्याच्या मार्ग सुकर झाला आहे. याचा प्रसार देशभर व्हावा, असा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

चांगले कर्म करून परलोकवासी होणे ज्यामुळे आपली आदर्श आठवण मागे रहावी, यालाच तर मोक्ष म्हणत नसतील का?
आपण जर झाडे लावून वाढवली नसतील, तर निसर्गाची दोन झाडे तोडून ती संपवण्याच्या आपल्याला अधिकार आहे का?

जे कमावले नाही ते खर्च केले की कर्जबाजारी होतो, अशानं मोक्ष व मुक्ती मिळेल का?, सर्व प्रकारचे ऋण आपण फेडतो, निसर्गाचे ऋणी का रहावे?
मराठीत चिता व चिंता यात केवळ टिंबाचा फरक आहे. पर्यावरणाला मात्र त्याची जबर किंमत मोजावी लागत आहे. स्वत:च्या चितेचा विचार सोडा, येणाºया पिढीची चिंता करा.

विजय लिमये/9326040204\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …