मानवी मेंदू

मस्तक ही प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील सर्वात महत्त्वाची कार्यशाळा असते. मानवी जीवनात घडणाºया प्रत्येक कृतीच्या पाठीमागे मेंदू कार्यप्रवण असतो. मस्तकात मेंदू नावाचा अवयव अत्यंत सुरक्षितपणे कार्यरत असतो, तोपर्यंत त्या प्राण्याला प्रत्येक कृतीचा निर्णय घेणे सुलभ जाते. प्रत्येक प्राण्याच्या शरीरात मेंदूचे कार्य व महत्त्व अनन्य साधारण असते. माणसाचे वयाच्या साठीपर्यंत सरासरी वजन त्याच्या उंचीच्या ८ ते ९ पट असते. त्यात मेंदूचे वजन १ ते दीड किलो असते. मनुष्य जो प्राणवायू घेतो, त्यातील जवळ जवळ २५% प्राणवायू मेंदूसाठी खर्च होतो. म्हणजे ज्याचे अस्तित्व दीड ते २% त्याच्या कार्यासाठी २५% प्राणवायू वापरला जातो. यावरूनच त्याच्या महत्तेची कल्पना येते. फक्त मानवी शरीराची रचनाच अशी आहे की, मेंदू हा अवयव सर्वोच्च स्थानी असून, संवेदना व आदेशांची देवाण-घेवाण करणाºया अत्यंत तरल मज्जासंस्था ज्या पाठीच्या कण्यात हजर असतात. तो पाठीचा कणा सरळ रेषेत उभा आहे. इतर प्राण्यांच्या बाबतीत तो कणा आडवा असतो. माणसाच्या मेंदूने दिलेले आदेश सर्व इंद्रियांपर्यंत ज्या गतीने पोहचतात आणि योग्य व झटपट कृती घडते. त्या गतीने इतर प्राण्यांबाबत घडत नाही. मेंदूने विचारांती घेतलेला निर्णय, त्याने इंद्रियांना पाठविलेले आदेश आणि अवयवांकडून करून घेतलेल्या अचूक कृती यांचा समन्वय माणसाच्या संदर्भात जेवढा जलद व परिणामकारक कार्य करतो, तेवढी गतीमान अचुकता इतर प्राण्यात दिसत नाही. इतरप्राणी माणसापेक्षा अजस्र आहेत, चपळ आहेत, वजनदार आहेत, आक्रमक आहेत, गगण भरारी घेणारे आहेत, सागरतळी लिलया विहार करणारे आहेत, ताकदवान आहेत, तरीपण माणसाने साºया प्राणी जगतावर वर्चस्व सिद्ध केले आहे. याचे एकमेव कारण त्याचा मेंदू. मानवी जीवनाची उत्तुंगता, दिव्यता व अचंबित करणारी भव्यता आजही अबाधित आहे. यात सिंहाचा वाटा मानवी मेंदूचा आहे. मानवी जीवनाच्या भौतिकतेला सुखासिनता, जीवन शैलीला समृद्धता व खडतर जगण्याला सुसह्यता प्रदान करणारी वैज्ञानिक समृद्धी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्याहून फलदायी आहे. त्या अफलातून किमयेचे आपण सर्वजन साक्षीदार आहोत. विचार प्रक्रियेचे प्रभावी केंद्र म्हणजे मेंदू. माणसाचा मेंदू शांतपणे विचार करतो, तेव्हा तो बुद्धाची करुणा प्रसरवत असतो, तर तो विद्रोही स्फोटकतेने कार्यरत होतो, तेव्हा युद्ध भूमिवरील कंदणासारखे रक्तपाट वाहवत असतो. विचारांच्या प्रांतात तो प्रज्ञावंता सारखा वावरतो, निर्णयाच्या बाबतीत तो तर्कशुद्ध असतो, खुन्नस देताना कर्दनकाळ असतो, तर भावनेच्या प्रांतात लोण्याहून मृदू असतो. कधी तो लाव्हा रसासारखा अग्नी लोळ होऊन हादरवून टाकतो, तर कधी श्रावण धारातून सृजन बरसणारा असतो. तो कधी माणसाला सैतान बनवून पशूच्या पातळीवर उतरवतो, तर कधी प्रेशीत बनून माणसातील दिव्य देवत्व प्रकट करतो. कधी तो जीवाला जीव देणारा जिगरी दोस्त बनवतो, तर निर्दयपणे जीवलगाचा जीव घेणारा कसाई ही व्हायला भाग पाडतो. थोडक्यात काय तर. साºया दैवी गुणांचा आणि दानवी दुर्गुणांचा संमिश्र गुंता म्हणजे मानवी मेंदू आहे असे वाटत राहते. तो कधी कसा निर्णय घेईल व कृतीचे कसे आदेश देईल, याचा अंदाज स्वत: आपण ही बांधू शकत नाही.
अमर्याद क्षमतांचा अजब किमयागार असणारा मानवी मेंदू संस्कारित करण्यात माणूस जर यशस्वी होत गेला, तर भूतलावर स्वर्गाच्या शतपट सौंदर्य, समृद्धी आणि सौख्य नक्कीच निर्माण करेल. संस्कार म्हणजे उपलब्ध गोष्टीची क्षमता व मर्यादा समजून घेऊन तिच्याद्वारे उत्तमातील उत्तम गोष्टी निर्दोषपणे मानवी समुहासाठी व सकल सृष्टीसाठी कार्यरत करणे होय. मानवी मेंदूची खासियत म्हणजे त्याच्यात एकाचवेळी हजारो केंद्रे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यरत असतात. किमान ७ ते ८ दशके हा मेंदू अगदी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहातोच. यावर अतिरिक्त तान येतो, याचे कारण त्याच्या कार्य पद्धतीवर आम्ही आमचे मतलबी काम त्याच्या इच्छे विरुद्ध लादतो. माणूस जेव्हा निरपेक्ष, नि:स्वार्थी, निखळ आनंददायी काम करतो, तेव्हा मेंदूला कार्यप्रेरणाच प्रदान केली जाते. मस्तक मानवी देहाचा कळस आहे. मस्तक मानवी देह मंदिराचा गाभारा आहे, तर मेंदू हा मानवी अस्तित्वाचा गाभा आहे. तंत्रज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर मेंदू हा अद्भूत मानवी देहाचा कंट्रोलर आहे. त्याच्या कार्यक्षम असण्यावरच जीवनाची अर्थपूर्णता अवलंबून असते. त्याच्या उत्तम स्वास्थासाठी जी काळजी घ्यावी लागते, तिला जीवनसाधना म्हटले जाते. अष्टांग योगातील ध्यान मेंदूच्या तानाला शिथील करणारे प्रभावी साधन आहे. खºया सज्जनांचा सहवास, शाश्वत मूल्ये जपणाºया साहित्याचे वाचन, चिंतन, मनन आणि सत्कायार्तील उत्स्फूर्त व निरपेक्ष सहभाग ही मेंदूच्या स्वास्थ्यासाठीची ऊर्जा केंद्रे असतात. मेंदूची मशागत विवेकी वैचारिकतेने करण्याची सवय लावून घेतली की, विकारांचे व विकृतीचे तनकट अंत:करणाच्या प्रदेशात वाढून मनाचे आंगण केरकचºयाचे घर बनत नाही. मनाची प्रसन्नता, देहाची विचारांची सात्विकता आणि आचरणाची शुद्धता मेंदूच्या कार्यप्रवणतेचे खाद्य असते. मनवी मेंदू शांतचित्ताने सात्विक विचार करू लागला, तर पृथ्वीची सर्वच आघाड्यांवर होणारी वाताहत टळून मरूभूमीतही नंदनवने फुलायला वेळ लागणार नाही. मानवी मेंदू सत्यानुगामी झाला, तर वैचारिकता विवेकी होईल आणि प्रत्येक कृतीला मानवाच्या वात्सल्यात भिजण्याचा आनंद लुटता येईल. त्या जगन्नियंत्याकडे एकच प्रार्थना, या शक्तिमान मेंदूला सात्विक चिंतनशीलतेचे सहचर्य लाभो आणि अखिल विश्वाला आनंदाचे आवार खुले होवो!

– प्रा. श्रीधर साळुंखे/ ९४२२६०६५०७

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …