महासत्ता गाजवण्याच्या मिंषेने चीन्यांनी केलेली आगळिक महाभयानक ठरली आणि त्याचे परिणाम अवघ्या जगाला भोगावे लागले. कोरोना महामारीच्या विळख्यात अन्य उद्योगांप्रमाणे चत्रिपट उद्योगही ठप्प झाला. बॉलीवूडही त्याला काही अपवाद नव्हते. कधी नव्हे ते सिनेमाच्या इतिहासात पहल्यिांदाच चत्रिपटगृहे तब्बल दीड वर्षे बंद राहिली. या पॅँडॅमिकमध्ये हिंदी फल्मि इंडस्ट्रीला तब्बल 6 हजार कोटींचा फटका सहन करावा लागला. आर्थिक नुकसानाबरोबरच हिंदी फल्मि इंडस्ट्रीला अनेक धक्केही पचवावे लागले. सद्धिार्थ शुक्ला सारखे अनेक तारे निखळले तर ड्रग्ज रॅकेट मध्ये अनेक नामांकित कलाकारांची नावे समोर आली. पॉर्न फल्मि सारख्या उद्योगाने बॉलीवूडची काळी बाजू उघड झाली तर दुसरीकडे पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अनेक आधारस्तंभांवर रोजीरोटीला मुकण्याची वेळ आली. परंतु मजबूर सही वक्त से हारा नहीं हूं म्हणत बॉलीवूड पुन्हा एकदा तितक्याच जोमाने उभा राहिला आहे. जगण्याचे नवीन नियम आपलेसे करत बॉलीवूडने वस्किटलेली घडी पुन्हा नीट करण्याचा कसोशीने प्रयत्न चालवला आहे. वर्षभरात या मायानगरीने काय गमावले आणि काय कमावले याचा घेतलेला हा आढावा…
सद्धिार्थ शुक्लाचे निधन…
2 सप्टेंबर 2021 रोजी भल्या सकाळी सद्धिार्थ शुक्लाचे हार्टॲटकने निधन अशी हेडलाईन समोर आली आणि त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. इतका वेल फिट अभिनेत्याचे अशापद्धतीने अकाली निधन होणे हे सर्वांनाच अस्वस्थ करणारे होते.
पॉर्न फल्मि प्रकरणी राज कुंद्राला अटक…
प्रख्यात अभिनेत्री शल्पिा शेट्टी हिचे वैवाहिक आयुष्य हे खरेतर कुणालाही हेवा वाटेल असे दिसत असतानाच अचानक तिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. सध्या राज कुंद्रा हा जरी जामिनावर सुटला असला तरी या संपूर्ण प्रकरणात अप्रत्यक्षरत्यिा शल्पिा शेट्टीही ओढली गेली आणि पतीबरोबर तच्यिाही वाट्याला बदनामी आली.
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या जाळ्यात…
नार्कोटक्सि कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)मुंबई हून गोव्याला निघालेल्या एका क्रूझ शिपवर छापा टाकून अंमल पदार्थाच्या वक्रिी-खरेदी प्रकरणी जेव्हा बॉलीवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतले तेव्हा प्रचंड खळबळ उडाली. सोशल मिडियावर शाहरुखच्या चाहत्यांनी शेकडो प्रतक्रियिा देत शाहरुखचे मनोबळ वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला खरा. परंतु आर्यनला कोर्टात सादर करण्यापासून सुनावणी पर्यंत इतकेच नव्हे तर तो तुरुंगातून बाहेर येईपर्यत हे प्रकरण सातत्याने चर्चेत राहिले. या प्रकरणाबाबत राजकीय पडसादही उमटले तर दुसरीकडे अभिनेता चंकी पांडेची कन्या अनन्या पांडेचे नावही समोर आले.
आमिर खान-किरण राव यांचा घटस्फोट…
प्रख्यात अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाने त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का दिला. भलेही आमिर आणि किरण हे आजही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत असले तरी त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने आमिरच्या चाहत्यांची मात्र त्याच्याबद्दल घोर निराशा झाली आहे.
2020 हे वर्ष अतिशय वाईट गेल्यानंतर 2021 तरी खूप चांगले जाईल असा सकारात्मक विचार करुनही बॉलीवूडला अनेक झटके बसले. परंतु हे सर्व धक्के तितक्याच धिराने पचवित बॉलीवूडने आपला नवा प्रवास नव्या उत्साहात सुरु केला. नव्याने वाट्याला आलेल्या गोष्टी हळूहळू नॉर्मल होऊ लागल्या आणि या सर्व गोष्टी अंगवळणी पाडत बॉलीवूडची घोडदौड सुरु झाली.
नर्बिंधासह सुरु झालेले शूटींग…
कोरोनाच्या दोन लाटांमुळे चत्रिपटांच्या शूटींगवर अनेक नर्बिंध लावण्यात आले. ठराविक क्रू मेंबर्सच्या उपस्थितीत शूटींग करण्याच्या परवानगीबरोबरच शूटींगची लोकेशन्सही बदलली गेली. शूटींगला जिथे परवानगी आहे अशा बाहेरच्या देशात शूटींग करण्याकडे बॉलीवूडचा कल दिसू लागला. त्यामुळे अधिकाधिक चत्रिपटांचे शूटींग हे विदेशात होताना दिसू लागले.
बायो बबल्स…
बायो बबल्स या संकल्पनेत सॅनिटाईज करण्यात आलेल्या एखाद्या ठराविक परिसरात किंवा जागेत चत्रिपटाचे शूटींग केले जाते. ही जागा एखाद्या आयझोलेशन सेंटरप्रमाणेच असते. अगदी मोजक्या व्यक्तींना या जागेत प्रवेश दिला जातो व या बायो बबल्समधील व्यक्ती बाह्य जगाशी केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. बायो बबल्समधील व्यक्तींना अनेक नियमांचे पालनही करावे लागते. त्या ठराविक परिसराबाहेरील कोणत्या वस्तूंना हात लावायचा किंवा कोणत्या व्यक्तीशी बोलायचे यासाठी काही नियम आखले जातात आणि त्या नियमांचे काटेकोटपणे पालन करावे लागते. मोठ्या प्रमाणात रखडलेली शूटींग्ज सुरु व्हावीत म्हणून बॉलीवूडने हा नवा बदलही स्विकारला व त्यानुसार बायो बबल्समध्ये अनेक चत्रिपटांची शूटींग्ज करण्यात आली.
चत्रिपटगृहांचा पडदा उघडल्यानंतर…
दरम्यान 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रात चत्रिपटगृहे सुरु करण्याची परवानगी मिळाली आणि सातत्याने प्रदर्शन लांबणीवर पडत असलेल्या अनेक बिग बजेट चत्रिपटांचे मार्गही मोकळे झाले. चत्रिपटांच्या प्रदर्शनासाठी एकीकडे स्पर्धा सुरु झाली तर दुसरीकडे अनेक फल्मिमेकर्सनी चत्रिपट प्रदर्शनाच्या तारखा मागे-पुढे करण्याचे सामंजस्यही दाखवले. काही फल्मिमेकर्सनी चत्रिपटगृहे सुरु झाल्यानंतरही ओटीटीचा मार्ग स्विकारणे पसंत केले आहे.50 टक्के क्षमतेसह चत्रिपटगृहे सुरु करण्याची अनुमती मिळाली असली तरी सूर्यवंशी, तडप आणि अंतिम सारख्या चत्रिपटांना प्रेक्षकांनी तिकीटबारीवर जोरदार कमाई करण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेला हा प्रतिसाद नक्कीच हुरुप आणणारा आहे. त्यामुळे ब्रम्हास्त्र, आरआरआर आणि लाल सिंग चढ्ढा सारख्या बिग बजेट चत्रिपटांच्या यशाबद्दल आता फल्मिमेकर्सलाही शाश्वती वाटू लागली आहे.
हॅपी एंडींग…
सिनेमाच्या हॅपी एंडिंग प्रमाणेच बॉलीवूडसाठी 2021 या वर्षाची अखेर ही खूप हॅप्पी गो लकी ठरली आहे. वर्ष सरता सरता अनेक गोड बातम्या कानावर पडू लागल्या. राजकुमार राव-पत्रलेखा तसेच वक्किी कौशल- कतरीना कैफ यांचा पार पडलेला शुभविवाह, प्रिती झिंंटा, नेहा धुपिया सारख्या अभिनेत्रींच्या घरी झालेले बाळांचे आगमन आणि लास्ट बट नॉट लस्टि प्रेक्षकांची पुन्हा एकदा चत्रिपटगृहांकडे वळलेली पावले… एकुणच या रुपेरी दुनियेने स्वत:शी ‘तु खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है’ अशी खूणगाठ बांधत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि नववर्षात त्यांचा हा प्रवास तितकाच यशस्वी ठरो अशाच त्यांच्या तमाम प्रेक्षकांकडून त्यांना लक्षलक्ष शुभेच्छा!
अवश्य वाचा
शिक्षक भरती घोटाळा
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …