गेल्या पाच वर्षांत सहा लाखांहून अधिक भारतीय लोकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुमारे १ कोटी ३५ लाखांहून अधिक भारतीय सध्या परदेशात वास्तव्य करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय परदेशी नागरिकत्व स्वीकारत असताना, दुसरीकडे मात्र अतिशय कमी म्हणजेच दहा ते अकरा हजार विदेशी नागरिकांनी आपले नागरिकत्व मिळावे यासाठी विनंती केली आहे. परदेशी नागरिकत्व मिळवणे हा खरोखरच वैयक्तिक प्रश्न आहे. आर्थिक किंवा व्यावसायिक उत्कर्षासाठी परदेशी राहणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. ज्यांचा परदेशात कायमस्वरूपी जाण्याचा आणि तिथेच राहण्याचा विचार आहे किंवा ज्याला दुसºया देशाचे नागरिकत्व स्वीकारल्याने प्रवास, व्यवसाय, शिक्षण आदी बाबतीत अनुकूलता मिळत असेल, तर त्याने ते जरूर करावे.
एखाद्याने भारतीय नागरिकत्व सोडले, म्हणजे त्याचा अर्थ त्याने भारतावर प्रेम करणे सोडले असा होत नाही. समाजात लोकप्रिय असणाºया अनेक व्यक्ती जशा अक्षय कुमार, सायरस मिस्त्री, आलिया भट आणि अगदी सुंदर पिचाई यांनी देखील भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला आहे. एखाद्या देशात नोकरी किंवा अन्य कारणासाठी ठराविक काळ कायदेशीररित्या राहिल्यास त्या देशाच्या नागरिकत्वाचे दरवाजे उघडले जातात. दुसरे म्हणजे ज्या देशाच्या भूमीवर जन्म होईल त्या देशाची नागरिकता आपोआप आणि बिनशर्त मिळेल.
इंग्लंडमध्ये या प्रकारे नागरिकत्व दिले जायचे, त्यामुळे पूर्वी ब्रिटिश-प्रशासित देशांत याच प्रकारे नागरिकत्व दिले जात असे. सध्या या तत्वाचा वापर प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतच होत आहे. ही प्रक्रिया इतकी सुलभ होती की, त्यामुळे बºयाच देशांतील पालक केवळ आपल्या होणाºया बाळाला त्या देशाचे नागरिकत्व मिळण्यासाठी प्रवास करायचे. हा गैरवापर थांबवण्यासाठी बहुतेक देशांनी जन्मणाºया बाळाच्या आई किंवा वडिलांपैकी एकाकडे तरी त्या देशाचे नागरिकत्व हवे अशी अट घातली आहे. पैसा देऊन कुठलेही काम करता येते. नागरिकत्वही याला अपवाद नाही. जगातले बरेच देश गुंतवणुकीद्वारे नागरिकत्व देतात.
युरोपातले काही लहान देश यात अग्रसर आहेत. आकाराने जरी हे देश लहान असले, तरी त्यांचे पासपोटर््स जगातील सर्वात शक्तिशालींपैकी आहेत. पासपोटर््स व्यतिरिक्तही या देशांच्या नागरिकत्वाचे बरेच फायदेही आहेत. यापैकी काही देशांत नगण्य किंवा शून्य आयकर द्यावा लागतो, तसेच संपूर्ण युरोपाचे दरवाजे खुले होतात. युरोपिअन संघाच्या कुठल्याही सदस्य देशांत राहू शकतात आणि नोकरी करू शकता. इतर देशाचे नागरिकत्व आपल्या उन्नतीसाठी घेण्यात काही हरकत नाही, परंतु काही व्यक्ती कर चुकवेगिरी करण्यासाठी याचा वापर करतात.
आपल्याला येथपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले त्या आई-वडिलांना ही मंडळी विसरून जातात. सर्वात जास्त मदतीची गरज असते, त्या वृद्धापकाळात त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी नसते. वृद्ध आई-वडील मात्र मुलांच्या आठवणीत एक-एक दिवस ढकलत असतात. ज्या आई-वडिलांनी व मायदेशाने आपला पाया भक्कम केला आहे, त्यांना कधीही विसरता कामा नये.
-े बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\