बळीराजाच्या चेहºयावरील थोड्या हास्यासाठी…

कांदा कापताना डोळ्यांत पाणी येते, पण जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही, कवडीमोल होतो, तेव्हा शेतकºयांच्या डोळ्यांत पाणी येते. ते आपल्या लक्षात येत नाही. आज चांगला भाव मिळून जर त्यांच्या चेहºयावर हसू उमटत असेल, तर काय हरकत आहे आणि ही स्थिती कायम नसते, थोडी कळ सोसुया. तिकिटांचे आॅनलाइन बुकिंग करताना त्यांचे चार्जेस आपण कुठलीही तक्रार न करता भरतोच. आपण घरी खाणे मागवतो (पिझ्झा, बर्गर व अन्य) तेव्हा किती पैसे भरतो?
दारू, सिगारेट याचे भाव वाढतात, त्यावेळी निमूटपणे देतो, उपलब्धता कमी असेल, तेव्हा दुप्पट किंमत देतो, दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावून वाटेल ती किंमत देऊन घेतो.

मॉलमध्ये, रिसॉर्ट व अन्यत्र साधी पाण्याची बाटली जी १५ रुपयांना असते तिला ५०रुपयांच्या वर मोजतो. फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न यांना १०० च्यावर मोजतो. एक छोटे कुटुंब जरी नाटक, सिनेमाला गेले तरी ३ ते ४ हजार खर्च करते. (ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते नक्कीच करावेत.)
आपल्याकडे येणारा दूधवाला, पेपरवाला यांना आपण एक महिन्यानंतर पैसे देतो, तेही वेळेवर किती जण देतात? त्यातून वेळेवर पेपर किंवा दूध आले नाही, तर त्याच्यावर चिडचिड आणि महिन्याचा हिशोब करताना, एखादा दिवस त्याने दूध किंवा पेपर दिला नसेल तर त्यावरून त्याचा जीव काढतो. (इतर ठिकाणी वस्तू मिळण्याच्या आधी पैसे भरतो, मग ती वस्तू कशी का असेना?) आता आपण मॉलमध्ये जातो, पण वाण्याने थोडे पैसे जास्त लावलेले आपण खपवून घेत नाही, पण इतरत्र पैसे आपण आगाऊ देतो किंवा रोख देतो, पण वाण्याकडे खाती असतात, त्यात त्यांना एक महिन्यांनी पैसे दिले जातात, कधीकधी २ ते ३ महिने देत नाहीत,तरी तो सामान देतो, एक कौटुंबिक नाते तयार होते जे मॉलमध्ये होते का? (त्याचे पैसे देताना तेही महिन्याभरानंतर आपण १० वेळा हिशोब तपासतो.)

हॉटेलमध्ये कांदा दरवाढीमुळे सर्व पदार्थांचे भाव वाढतील, पण जेव्हा कांद्याचे भाव कमी होतील, तेव्हा हॉटेलमध्ये व अन्यत्र भाव कमी होतील?
जलसिंचन घोटाळा करणारे आज सत्तेत सहभागी आहेत, मल्ल्या, नीरव मोदी, राज्य सहकारी बँक, बुडीत जाणाºया बँका हे काय कमी रडवत आहेत? त्या तुलनेत कांदा कमीच रडवत आहे आणि २ पैसे अधिक मिळून जर काही काळ शेतकºयांच्या चेहºयावर हसू येत असेल, तर काय हरकत आहे, कांदा कापताना तसे डोळ्यांतून पाणी येतेच, त्यांच्या चेहºयावरील थोड्या काळासाठी येणाºया हास्यासाठी थोडे जास्त पाणी आपल्या डोळ्यांत आले, तर काय हरकत आहे?

हेमंत कालेलकर/ 9209263239\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …