बँका आणि सर्वसामान्य माणूस

Crime icon vector isolated on white background, logo concept of Crime sign on transparent background, filled black symbol

गुजरातमध्ये जहाज बांधणी व दुरुस्ती करणाºया एबीजी शिप यार्ड या कंपनीने बँकांना बावीस हजार कोटी रुपयांचा चुना लावला आहे. यापूर्वी हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या यांनी देशातील अनेक बँकांची हजारो कोटींची फसवणूक केली. दुसरीकडे कर्ज काढणे हे कमीपणाचे आणि ते नाईलाजास्तव काढावे लागले, तर परतफेड करण्याची क्षमता गमावणे हे जगण्यापुढचे संकट वाटणारा मोठा वर्ग देशामध्ये आहे. अशा हजारो शेतकºयांनी गेल्या काही वर्षांत आपले जीवन संपवले आहे. काही हजारांचे कर्ज काढल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक वाया जाते आणि शेतकरी मुदतीत परतफेड करण्यास असमर्थ ठरतो. अशावेळी बँकेकडून वसुलीची साधी नोटीस आली, तरी सैरभैर होऊन जीवन संपवल्याची अनेक उदाहरणे आहेत. एकीकडे इभ्रतीला जपणारा असा संवेदनशील वर्ग आणि दुसरीकडे बँकेचे कर्ज बुडवण्यासाठीच असते अशी धारणा असलेला उद्योजक, व्यावसायिक वर्ग पाहायला मिळतो.

ही मंडळी बँकांना कशी राजरोसपणे गंडा घालतात, हेच दिसून येते. सरकारचे आणि बँकांचे धोरण उद्योजक आणि व्यावसायिकांना मैत्रीपूर्ण राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. उद्योग वाढीसाठी आणि त्यातून पर्यायाने रोजगारनिर्मिती व्हावी म्हणून अशा बाबींना प्रोत्साहन देण्याबाबत कुणाची हरकत असण्याचे कारण नाही, परंतु बँकांचे यासंदर्भातील धोरण विषमतामूलक असते. जो सामान्य माणूस गरजेसाठी छोट्या कर्जाचा अर्ज घेऊन जातो, त्याला बँकांमध्ये तुच्छतेची वागणूक दिली जाते. काही बँक अधिकारी, तर अशा गरजवंतांना भिकाºयासारखे वागवत असतात. जो सामान्य माणूस कर्जाची पै न पै परतफेड करणार असतो, त्याला अवमानास्पद वागणूक मिळत असताना बड्या कर्जदारांसाठी मात्र पायघड्या घालत असतात.
त्यांच्या अनियमिततांकडे दुर्लक्ष केले जाते. बँकांची फसवणूक होण्यामागे अधिकाºयांची ही मानसिकताही कारणीभूत आहे. माणूस जेवढा मोठा किंवा कर्जाचा आकडा जेवढा मोठा तेवढी जोखीम मोठी असते. त्यामुळे त्यासंदर्भात अविश्वासाची भावनाही तेवढीच असायला पाहिजे, परंतु घडते उलटेच. बँक अधिकारी अशांच्याकडे काणाडोळा करतात आणि त्यातून मग पुढचे सगळे महाभारत घडत असते. किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या तीन हजार कोटींहून अधिक रकमेचा गंडा घालून परदेशात गेल्यानंतर अशा कर्जबुडव्यांची चर्चा सुरू झाली. ही चर्चा आर्थिक अंगाने होऊन काही धोरणात्मक सुधारणांच्या दिशेने गेली असती, तर संकटातून संधी दिसली असती.

परंतु कितीही गंभीर प्रश्नाचे राजकारण करण्यात आपण पटाईत असल्यामुळे मल्ल्याला कर्ज कुणाच्या काळात दिले आणि तो पळून कुणाच्या काळात गेला, याचीच चर्चा करीत राहिलो. नीरव मोदी अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झाला. सामान्य माणसाला जे आकडे सहजासहजी निर्दोष लिहिता येणार नाहीत, एवढ्या मोठ्या रकमेच्या घोटाळ्यांमुळे बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. कोणतेही कारण नसताना कोट्यवधींचे कर्ज थकवायचे आणि व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम व्यक्तिगत संपत्ती वाढवण्यासाठी, आलिशान जगण्यासाठी वापरण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशांवर कायदेशीर कारवाईचा कठोर बडगा उचलायला पाहिजे आणि त्यांचे उर्वरित आयुष्य तुरुंगात सडले पाहिजे, तरच या बुडवणुकीला आळा बसेल आणि सामान्य माणसांचा बँकांवरचा विश्वास टिकून राहील.
े बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …