प्रवाशांच्या तारांबळीसाठी…

गुरुवारी संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेत कर्मचाºयांच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले. त्याचवेळी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही केले. एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून राज्यातील एसटी वाहतूक सेवा सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा होती. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असलेल्या एसटीची आजची अवस्था प्रवाशांच्या तारांबळीसाठी अशी झाली आहे.
मात्र आजही राज्यात अनेक एसटी डेपोंच्या ठिकाणी एसटी कर्मचाºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाºयांनी नकार दिला. विशेषत: सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे, लातूर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोंच्या ठिकाणी एसटी कर्मचाºयांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. जवळपास २५० पैकी १३७ आगारांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
राज्यात इतरही ठिकाणी तुरळक का होईना एसटी कर्मचाºयांचे आंदोलन सुरू आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव डेपोमध्ये एसटी कर्मचाºयाने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाºया कर्मचाºयांच्या संतापात भर पडली आहे. या आंदोलनाचा फटका संबंधित जिल्ह्यात सर्वसामान्यांना बसला असून, म्हणावी तेवढी एसटी सेवा राज्यात सुरळीत सुरू झालेली नाही. तेव्हा यावर आता कसा तोडगा निघणार?, आंदोलन किती दिवस चालणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
परिणामी सर्व सामान्य आणि विशेषत: ग्रामीण भागांतील प्रवाशांना ऐन दिवाळीत त्रासाला तोंड द्यावे लागले आहे. शासकीय कर्मचाºयांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देणे व घरभाडे भत्ता देणे या मागण्या जरी मान्य झालेल्या असल्या, तरी एसटी कामगारांनी संप सुरू केला आहे. कर्मचा‍ºयांनी सरकारकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाºयांना न्याय देण्याची ही प्रमुख मागणी केली आहे. गेल्या ६ महिन्यांत २७ एसटी कर्मचाºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
त्यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांच्यासोबत असे घाणेरडे राजकारण करणे बंद करा, तसेच एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा, असा इशारा विरोधी पक्षातर्फे देण्यात आला आहे. शेवगाव डेपोतील चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी एसटी बसलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत दु:खद घटना घडली. काकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुणीही टोकाचे पाऊल उचलू नका. एकजुटीने आपण हा लढा लोकशाही मार्गाने जिंकू. या आत्महत्या केलेल्या २८ कर्मचाºयांना न्याय मिळवून देऊ, असा दिलासा या कर्मचाºयांना विरोधी पक्षातर्फे दिला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लाल परी सुरू होणे गरजेचे आहे. एसटीची वाहतूक बंद असल्याने जास्तीचे भाडे देऊन नाईलाजास्तव खाजगी बस, टेम्पोने प्रवास करावा लागत आहे. ज्या काळात जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक करून एसटीचा तोटा भरून काढायचा, त्याचवेळी संप करून एसटीचे चाक खोल रुतत चालले आहे. शासनकर्ते हा तिढा वेळीच सोडावतील अशी अशा आपण करूया. जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत.
े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …