पाणी वाचवा

 

दरवर्षी पाण्याचे कितीही नियोजन केले, तरी उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यामध्ये पाण्याचा अधिक चटका ग्रामीण व शहरांतील झोपडपट्टीतील रहिवाशांना बसत असतो. तेव्हा आतापासून पाण्याची बचत करावी लागणार आहे. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. म्हणजे आपल्याला उत्तम आरोग्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे पाण्याला आपण सर्वजन जीवन म्हणतो. म्हणजे पाणी हेच आपले जीवन आहे, तेव्हा पाण्याचा योग्यप्रकारे वापर करणे गरजेचे आहे. पाणी हे निसर्गनिर्मित असले, तरी स्वच्छ पाण्यासाठी काही लोक महिन्याला अंदाजे दीड लाख रुपये मोजत असतात. म्हणजे इतके मूल्य पाण्याला आहे. सुद्धा पाणी हे शासनाला महसूल मिळविणारे प्रभावी साधन झाले आहे. तेव्हा शासनाने पाण्याचा योग्य विनियोग केला पाहिजे. पाण्याने अनेकांना रोजगार मिळवून दिलेला आहे. त्यासाठी योग्यप्रकारे उपलब्ध पाण्याचा वापर झाला पाहिजे.

राज्यात तसेच देशात उन्हाळ्यात बºयाच ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन केले पाहिजे. प्रत्येक विभागवार नळ योजना असेल, तर त्या विभागात नळ योजना जोडून पाण्याचा अपव्यय न करता सर्वांना पाणी कसे मिळेल किंवा प्रत्येकांनी पाण्याचा साठा कसा करून ठेवता येईल या कडेही शासन पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत.
बºयाच वेळा काही लोकांना पाणी मिळते, तर काहींना मिळत नाही, तेव्हा सर्वांना पाणी कसे मिळेल याचे नियोजन करावे. म्हणजे पाण्याचे योग्य प्रकारे वाटप होऊ शकेल. याचा परिणाम पाण्याचे योग्य वाटप झाल्याने पाण्याची बचतही होऊ शकते.

शहरात बºयाच ठिकाणी २४ तास पाणी असते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे पाणी एक, दोन तास आले नाही, तर लोकांची फोना फोनी सुरूहोते. काहींना तर काय करावे ते सुचत नाही. मग सांगा खेड्यात पाण्याचा दुष्काळ असल्याच्या बातम्या वाचतो त्यावेळी त्यांची परिस्थिती काय झाली असेल, याचा विचार होणे गरजेचे आहे. आजही ग्रामीण भागांतील लोक नद्यानाल्याचे पाणी पिताना दिसतात. म्हणजे स्वच्छ पाणी बाजूलाच झालेले दिसते. प्रत्यक्षात मे महिन्यामध्ये ग्रामीण भागांत गेल्यानंतर हे चित्र पाहायला मिळेल.
शहरात काही सोसायट्यांमध्ये पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. पाणी टंचाईमुळे मुक्या प्राण्यांना तडफडून मरण्याची वेळ आपल्या महाराष्ट्रात आल्याचे चित्र सन २०१९ मध्ये पाहायला मिळाले. जरी यावरी चारा छावण्या उभारण्यात आल्या, तरी प्रत्येकाला हक्काचे स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे.

पाणी हे निसर्गनिर्मित आहे. त्याचा योग्यप्रकारे वापर झाला पाहिजे. केवळ जाहिरातबाजी करून पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. पाण्याचा योग्यप्रकारे वापर झाला पाहिजे. तेव्हा उन्हाळ्यातील पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी आजपासून पाणी वाचवले पाहिजे ही देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.

रवींद्र तांबे/झरोका

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …