ठळक बातम्या

पंख छाटले की, नवी भरारी?


राज्यभरात मागील काही दिवसांमध्ये खळबळ उडवून देणाºया मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात, आर्यन खानसोबत चर्चांच्या केंद्रथानी राहिलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून क्रूझ ड्रग्ज केससह सहा प्रकरणांचा तपास शुक्रवारी काढून घेण्यात आला आहे. त्यांची बदली आता दिल्ली एनसीबीत करण्यात आली आहे. आता हा तपास एनसीबीचे एक केंद्रीय पथक करणार आहे, ज्याचे नेतृत्व एनसीबी अधिकारी संजय सिंह करणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंचे पंख छाटले, अशी चर्चा सुरू करण्यात आली, परंतु खरोखरच त्यांचे पंख छाटले गेले आहेत की, त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी ही टीम येऊन नवी भरारी घेणार आहे, हे आता लवकरच समजेल; पण समीर वानखेडे यांना हटवले, म्हणजे यातील आरोपी निर्दोष आहेत, असे अजून सिद्ध झालेले नाही, हे लक्षात आले पाहिजे. किंबहुना त्यांना तपासातून दूर केले, म्हणजे हा तपास पुढे होणार नाही, असे समजायचे कारण नाही. उलट हा तपास थांबणार नाही, तो पूर्ण केला जाईल, असाच संदेश एनसीबीनं दिलेला आहे. त्यामुळे आता नवाब मलिक हा तपास होऊ नये आणि आपल्या जावयाला सोडावे यासाठी आणखी काय कुरापती करतात हे पाहावे लागेल.

या तपासात आपल्या जावयाला सोडवण्यासाठी, हा तपास होऊ नये यासाठी नवाब मलिक हट्टाला पेटले. कोणत्याही थराला जाण्याची गलिच्छ राजनीतीही त्यांनी सुरू केलेले पाहिले. अगदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीलाही बदनाम करण्याची घाणेरडी रणनीती त्यांनी आखले. पण दुसºयावर चिखलफेक करून आपले निर्दोषत्व कधीच सिद्ध होत नाही, याचे भान नवाब मलिक विसरले आहेत. आज नवाब मलिक यांची लढत ही एकाकी आहे. जोपर्यंत त्यांच्या जावयाचे निर्दोषत्व सिद्ध होत नाही आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांनी कितीही तपासात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, तरी त्यांच्याच पक्षातील कोणताही वरिष्ठ नेता त्यांचे समर्थन करताना दिसत नाहीत. जवळपास महिनाभर नवाब मलिकांची आदळआपट चालली आहे; पण देशातल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच व्यक्त होणारे शरद पवार या प्रकरणाबाबत काहीही बोलत नाहीत, याचा नक्कीच अर्थ आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. अर्थात त्यांना आर्यन खानशी काहीही देणे-घेणे नव्हते. त्यांना चिंता होती ती त्यांच्या जावयाची. त्यामुळे शाहरूख खानने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर प्रचारासाठी यावे, म्हणून त्याचे समर्थन नवाब मलिक करत आहेत, असेही नव्हते; पण समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास हेतुपुरस्सर विशिष्ट पद्धतीने करत असल्याची देखील टीका नवाब मलिक यांनी केली होती. त्यानंतर आता एनसीबीनं मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर याठिकाणी समीर वानखेडे हा मुद्दा नव्हताच. अमली पदार्थ सापडले की नाही, हा मुद्दा महत्त्वाचा होता. समीर वानखेडेंनी कोणता धर्म स्वीकारावा, कोणती जात असावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा तपासाशी काहीही संबंध नाही; पण त्यांच्या तपासात कोणताही दोष सापडत नाही, म्हणून त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचे घाणेरडे काम नवाब मलिक यांनी केले, तरीही हा तपास ते थांबवत नाहीत म्हटल्यावर नवाब मलिकांनी भाजप, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नीला बदनाम करण्याचे प्रकार केल; पण त्यामुळे महाराष्ट्रात ना फडणवीस बदनाम झाले ना त्यांची पत्नी. याउलट नवाब मलिकांबद्दल महाराष्ट्रात घृणा निर्माण झाली. नवाब मलिकांचे समर्थन महाविकास आघाडीतील कोणत्याही निर्णायक नेत्याने केलेले नाही, हे पण लक्षात घेतले पाहिजे. या प्रकरणाचा तपास एनसीबीच करणार आहे. त्याठिकाणी एनसीबीचे अधिकारी कोण आहेत, हे महत्त्वाचे नाही. एनसीबीचे नवीन अधिकारी, नवीन टीम पुन्हा पहिल्यापासून तपासाला सुरुवात करेल. त्यासाठी पुन्हा जावयांना ताब्यात घेण्याची त्यांनी तयारी केली, तर नवाब मलिकांचा हाच जावई सासºयाच्या नावाने खडे फोडल्याशिवाय राहणार नाही.

आता एनसीबीची नवी टीम मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या केसचा देखील समावेश आहे. समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, आमच्या झोनच्या एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय होता.
आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर समीर वानखेडेंनी एएनआयला सांगितले की, मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी मी न्यायालयात याचिकादेखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे. त्यामुळे ज्यांना वाटत आहे की, समीर वानखेडेंचे पंख छाटले आहेत, त्यांना तसे वाटू देत; पण यामुळे त्यांच्या पंखात बळ आलेले आहे आणि ते तपासाची नवी भरारी घेतील. आता हे प्रकरण नेमके काय आहे, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. एनसीबीला तंबाखू आणि हर्बल टोबॅको यातील फरक कळतो की नाही, हे जनतेला समजले पाहिजे. हा फरक कळत नाही, असा नवाब मलिकांचा आरोप होता. जावयाकडे सापडलेला २०० किलोचा साठा हा हर्बल तंबाखू होती, गांजा नव्हता असा दावा नवाब मलिकांनी केला होता. त्यामुळे एवढी तंबाखू त्यांच्या जावयाने कशासाठी घेतली होती हे पण समजले पाहिजे. तंबाखू खाणारा कितीही पट्टीचा असला, तरी तो इतका साठा करून ठेवेल असे वाटत नाही. त्यामुळे जावई हे तंबाखूचा व्यापार करणारे निपाणीचे तंबाखूचे व्यापारी लखोबा लोखंडे होते का, हे बघायला हवे.

About Editor

अवश्य वाचा

भारतीय संविधान दिन

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘जर मला संविधानाचा गैरवापर होत …

One comment

  1. Pingback: hawaiian runtz