ठळक बातम्या

नेकी


नेकी कर और दर्या में डाल! असाही एक फंडा आपण नेहमी ऐकत आलो आहोत, पण याचाही फक्त चुकीचाच अर्थ सोईस्कररित्या आपण लावत असतो. खरेतर (काही सन्माननीय अपवाद वगळता) सर्वांना तशी सवयच झाली आहे आणि याचे कारणसुद्धा अगदी साफ आहे की, आरशात स्वत:ला न पाहताच आपण आपल्या सगळ्या ब‍ºया, वाईट (ब‍ºयाचदा वाईटच) कर्मांबद्दल स्वत:च क्लीन चिट देत असतो. आपण आदर्श असतो ना! किंग कॅन डू नो राँगच्या धर्तीवर, आय कॅन डू नो राँग! अशी आपली पक्की समजूत असते. त्यामुळेच मी सगळ्या जगाशी इतका चांगला वागतो, चांगले बोलतो, सर्वांचे भले करतो, पण बदल्यात मला काय मिळते?, तर निंदा-नालस्ती आणि उपहास! म्हणतात ना, नेकी कर और दर्या में डाल!

तर, नेकी कर वगैरे या फंड्याला अशा प्रकारे चुकीची मान्यता देण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, समजूतदार माणसाने आपल्या वाट्याला येईल ते कर्म सहज आणि सरळपणे करावे. ते कर्म करण्यातच आनंद मिळवावा आणि ते कर्म पार पडताच श्रेयाची अपेक्षा न करता चुपचाप दूर व्हावे. म्हणजेच नेक कर्म करून स्वत: कडे कर्तेपण न घेता घडलेल्या सगळ्या गोष्टी गुलदस्तात ठेऊन त्याची चावी समुद्रात फेकून द्यावी. त्या नेक कामाचे श्रेय घेण्याचा दावा करू नये. थोडक्यात नेकी करा, पण त्याची वाच्यतासुद्धा करू नका, तर नेकी कर और दर्या में डाल याचा अर्थ असा होतो, ना की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे! मुळात आपण अँट आवर ओन, काही करू शकतो, हीच मोठी भ्रांती आहे. खोटे वाटते? आपण रोज रात्री (कधी दिवसासुद्धा) झोपत असतो. निद्रावस्थेत आपले अस्तित्व हे शून्य झालेले असते. झोपेत आपण कोणतेही कृत्य करू शकत नाही, कारण निद्रा हा एक तथ्यगत मृत्यूच आहे आणि तरीही आपण झोपेत असताना आपला श्वास चालू असतोच ना?, पोटातल्या अन्नाचे पचन होतच असते ना?, शरीरात रक्त धावत असतेच ना?, मग सांगा, हे सारे आपण एट आवर ओन करत असतो नाही का?, सारे काही घडत असते, आपण केवळ निमित्तमात्र असतो. घराच्या छताला चिकटलेली पाल, तिला कितीही वाटले, तरी ते छत पेलून धरत नसते. आता या बॅकग्राऊंडवर, प्रयत्नांती परमेश्वर हे विधान नीट तपासून पाहा. सगळे काही आधी मी करणार, नाहीच जमले, तर शेवटी देव आहेच! हे आणि असे फंडे माणसाला नक्की गाईड करतात की, मिस-गाईड करतात, हे कधीतरी डोळे उघडे ठेवून पाहायला नको?
– चंद्रशेखर खेर\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …