नवी ओळख निर्माण करणे

सुरतच्या एका तरुणीने आपल्या ओळखपत्रामधून आपलं आडनाव आणि धर्म काढून टाकण्याची परवानगी देणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

माझ्या नावामागे माझी जात आणि धर्माचा उल्लेख आहे आणि या उल्लेखाची मला अडचण आहे. माझ्या नावामागे लागलेला धर्म आणि जातीची ओळख मला इतर लोकांपासून वेगळे करते. त्यामुळे आता मला धर्म आणि जातीची ओळख नकोय, लोकांनी मला एक सामान्य व्यक्ती म्हणून बघावे, अशी माझी इच्छा आहे. खरेतर ही कल्पना योग्य आहे. अर्थात हा विचार तरुणांमध्ये आजच आला हे नाही. साधारण तीस वर्षांपूर्वी साताºयातील एका विद्यार्थ्याने आपल्या अर्जात धर्म आणि जात या रकान्यात धर्मापुढे मानवता असे लिहिले होते आणि जात या रकान्यात भारतीय असे लिहिले होते. विद्यापीठ तो अर्ज स्वीकारत नव्हती; पण न्यायालयात जाऊन त्याने याला मान्यता मिळवली होती.

धर्म आणि जात जर माणसामाणसांमध्ये फूट पाडणार असेल, तर असे धर्म काय कामाचे? धर्म आणि जातीची ओळख होईल, अशीच नावे आणि आडनावे आपल्याकडे दिसतात. एखाद्याने फक्त नाव सांगितले, तर तो कोणत्या जातीचा आहे, हे समजण्यासाठी तुमचे आडनाव काय? म्हणजे हे आडनाव कोणत्या जातीत येते यावरून तर्क केले जातात. त्यामुळे या नावाच्या प्रथेबाबत काही तरी बदल करणे गरजेचे आहे.

नावावरून तो फक्त भारतीय आहे, हे कळेल असेच नाव असले पाहिजे; पण भारतातील कोणत्या धर्माचा तो आहे याची ओळख समोर येणार नाही, अशी नावे तयार झाली पाहिजेत.

आपण फक्त निधर्मी देश आहे असे म्हणतो; पण प्रत्यक्षात हा देश निधर्मी नसून सर्वधर्मी आहे. त्यामुळेच भेदभेदाच्या भिंती तयार होतात. प्रत्येकाने आपल्या मुलांची नावे ही धर्मातील कशाच्या संबंधाशी ठेवायची असा अलिखित नियम झाला आहे. साताºयात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांना मुलगा झाला, तेव्हा त्याचे नाव हमीद ठेवले होते. आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी मुलाचे नाव हमीद ठेवले. साधारणपणे हमीद हे नाव मुस्लीम समाजातील मुलांमध्ये असते. पण आपण धर्मभेद मानत नाही, हे दाखवण्यासाठी त्यांनी मुलाचे नाव हमीद ठेवले.

पण त्याहीवेळी त्यांच्यावर टीका झाली होती. त्या टीकेचे तर्कही भयानक होते, म्हणजे डॉक्टर दाभोलकरांनी मुलाचे नाव हमीद ठेवले; पण मुलीचे नाव मात्र मुक्ता ठेवले. मग मुलीचे नाव हसिना का नाही ठेवले? अर्थात टीका करणारे कोणत्याही बाजूने टीका करणारच; पण नाव आणि आडनावातच जात आणि धर्म समजेल याची खबरदारी पूर्वापार आलेली आहे; पण काही नावे ही जात आणि लिंगभेदाच्या पलीकडची आहेत. अशी नावे पुढे आली पाहिजेत, म्हणजे किरण या नावावरून समजत नाही की, ती मुलगी आहे की मुलगा आहे. चारू नावावरून समजत नाही तो चारू आहे की, ती चारू आहे. त्याचप्रमाणे समीर हे नाव असे आहे की ते हिंदू, मुसलमान या दोन्ही धर्मांचे लोक ठेवतात. अशी बरीचशी नावे आहेत, त्या नावांचा वापर केला तर आपली जात-धर्म लपेल. पण खरंतर जन्मदाखला आणि कोणत्याही अर्जातील जात-धर्म हा रकाना बंद केला, तर जास्त चांगले होईल.

पण गुजरातच्या या मुलीच्या डोक्यात हा विषय आला हे चांगलेच आहे. या मुलीचे नाव आहे काजल मंजुला. ही मूळची चोरवाड शहरातील असून, सध्या ती सुरत येथील एका निवारागृहात राहते. तिच्या ओळख प्रमाणपत्रावरील तिच्या नावामागे असणारा जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती तिने गुजरात हायकोर्टाकडे केली आहे.

काजलचे वडील शिक्षक होते आणि ते जातीने ब्राह्मण होते. चोरवाडसारख्या छोट्या गावात जात आणि धर्माला खूप महत्त्व आहे. इतर जातीतील लोकांमध्ये मिसळायची तिला अडचण येत होती. अर्थात एकविसाव्या शतकातील तिसºया दशकात यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.

पण ती ब्राह्मण असूनही निवारागृहात राहते, त्यामुळे तिला अडचण येते आहे, हे विशेष. निवारागृह हे कोणत्या विशिष्ठ जातीच्या लोकांसाठी असते का? असा प्रश्न यातून निर्माण होतो. या मुलीची अवस्था आई-वडील असूनही अनाथ असल्यासारखी आहे. सावत्र आईशी पटत नसल्याने तिला निवारागृहात राहणे अडचणीचे होत आहे, म्हणजे जगण्यासाठी जात आणि धर्म अडचणीची होत असेल, तर अशी जात आणि धर्म काय कामाचा?, जो धर्म जगू देत नाही त्या धर्माचा काय उपयोग?, ज्या नावातून धर्माचा उल्लेख होतो, अशी नावे काय कामाची? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात; पण नव्या पिढीला या भिंती तोडायच्या आहेत. या धर्माच्या भिंती पाडणे आणि खºया अर्थाने सर्वसमावेशक समाज निर्माण करणे गरजेचे आहे.

आज काजल ही नो कास्ट, नो रिलीजनसाठी न्यायालयात अर्ज करणारी गुजरातमधील पहिली तरुणी आहे. गुजरातसारख्या राज्यात हे होत आहे, हे चांगले आहे. महाराष्ट्रात हा विषय केव्हाच सुरू झालेला आहे. अनेकजण गॅझेटमध्ये जाऊन आपले नाव बदलून घेतात आणि त्यातून जातीचा बोध होणार नाही, अशी नावे घेतात.

आज जात आणि धर्माच्या नावे होणाºया भेदभावामुळे बरेच लोक त्रस्त आहेत. एका महिलेने हे पाऊल उचलले आहे, तर समाजात नक्कीच मोठा फरक पडेल. मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आहे. ज्यामध्ये एका महिलेला नो कास्ट, नो रिलीजन अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

काजलचा विश्वास आहे की जर तिला नो कास्ट, नो रिलीजन प्रमाणपत्र मिळालं, तर ती तिचा पासपोर्ट, तिचं आधार कार्ड इत्यादींमधून जात आणि धर्माची ओळख मिटवू शकते आणि जेव्हा ती नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाईल, तेव्हा तिला कोणीही जातीसंबंधी प्रश्न विचारणार नाही.

खरंतर याबाबतीत फिल्म इंडस्ट्रीला याची जाणीव कैक दशकांपूर्वीच झालेली होती. एखाद्या विशिष्ठ नावावरून तो कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, हे कळू नये म्हणून चित्रपटसृष्टीत टोपणनावे घेण्याची प्रथा फार पूर्वीपासून आली. दिलीपकुमार यांचे मूळचे नाव युसूफ; पण त्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्याच्या काळात सुरू असलेला. तेव्हा भारत-पाक फाळणीचे दिवस होते. हिंदू-मुस्लीम यांच्यात संघर्ष होता. अशा परिस्थितीत त्यांचे दिलीपकुमार हे नाव ठेवून त्यांनी बॉलीवूड व्यापून टाकले. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर १९८५ला राज कपूर यांनी मंदाकिनीला आणले. ती पाकिस्तानी होती; पण तिची तशी ओळख राहू नये, म्हणून तिचे नाव मंदाकिनी ठेवले गेले. अशाप्रकारे आपल्या नावावरून आपण नेमके कोणत्या धर्माचे आहोत हे कळू नये, म्हणून अनेक कलाकारांनी आपली नावे बदलली होती. काजल किरण, कविता किरण, उषा किरण, जितेंद्र ही सगळी मूळ नावे नाहीत. या कलाकारांची मूळ नावे वेगळी आहेत, पण त्यांना जाती-धर्माची ओळख मिटवायची होती.

– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …