आपल्या घरी गाय आली की, आपण तिला प्रेमाने पोळी-भाकरी खाऊ घालतो, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. गायी सुद्धा प्रेमाने पोळी खातात; पण वास्तव काही वेगळेच आहे. हे त्यांच्यासाठी जंक फूडसारखे आहे.
गायीला कृपया पोळी देऊ नका, निसर्गाने गायीला शिजवलेले अन्न खायला बनवलेलेच नाही. आपण घरात आणलेल्या पालक, मेथी वगैरे भाज्यांमधून आपण आपल्यासाठी पाने ठेवतो आणि बाकी राहिलेले देठ, मुळे फेकून देतो. तुम्हाला जर गायीला खायला काही द्यायचेच असेल, तर उरलेल्या भाज्यांची देठ द्यावीत किंवा गवत विकत घ्या आणि खायला द्या. दुसरा पर्याय म्हणजे एक रात्र भिजवलेले हरभरे, गहू, तांदूळ, मूग, मटकी द्यावी.
त्यांना पोळी, भाकरी खायला दिली, तर त्यांच्या शेणाचा वास माणसाच्या विष्ठेसारखा येतो. गायीची पचनसंस्था बिघडते, कारण त्यांच्या पचनसंस्थेमध्ये असलेले बॅक्टेरिया असे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त किंवा मदत करत नाहीत. आगीवर स्वयंपाक केल्याने अन्नामध्ये रासायनिक बदल होतो, जो गवत खाणाºया प्राण्यांना पचन संस्थेला मान्य होत नाही.
निष्पाप प्राण्यांची सेवा करताना, कळत नकळत, त्यांचे आरोग्य बिघडण्याचे कारण बनू नका. आपण शिजवलेले अन्न खातो, त्यामुळे विष्ठेला दुर्गंधी येते. जर आपण कच्च्या भाज्या, फळे, म्हणजे सर्व काही कच्च्या खाल्ल्यास विष्ठेचा वास वेगळा असेल. देवाने ज्या स्वरूपात अन्न दिले आहे, त्याच रूपात गायीला द्यावे, त्यात छेडछाड करू नका.
-विजय लिमये/9326040204\\