एसटी कर्मचाºयांच्या खूप कथा लिहिता येतील; पण त्यांच्या जगण्याच्या व्यथा कधीच संपणार नाहीत. शासन व्यवस्थेने त्यांच्यावर केलेला अन्याय खरंच योग्य आहे का? आणि जर खरंच योग्य असेल, तर त्यांना असे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आणखी किती दिवस सहन करावा लागणार?
भविष्यातलं एसटी कर्मचाºयांनी बघितलेलं सत्यातलं स्वप्न आजवर आलेल्या प्रत्येक माय-बाप सरकारने वेळोवेळी हिरावून नेलं खरं; पण त्यांच्या भूकेचं, पोटा-पाण्याचं स्वप्न असं हिरवता आलं असतं, तर किती बरं झालं असतं नाही का!
तशी काही औषधी मात्रा या माय-बाप सरकारने शोधली, तर किती बरे होईल. खरंतर हे एसटी कर्मचारी त्यांच्या जीवनाच्या रानावनात खूप सुखी होता. जगत असलेल्या जीवनाचाही तो पुरेपूर आनंद घेत होता.
सावलीत काम नव्हतं; मात्र तो काळ्या मातीत सावलीपेक्षा मोठा आनंद घेत होता. भयंकर आजारपण गेले-आले खरे; पण या एसटी कर्मचाºयांना त्यांच्या हक्काचे ‘पगार, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढ हे सर्व देता का’?, असं म्हणण्याची वेळ का म्हणून त्यांच्यावर आली.
शेवटी महाराष्ट्र थांबला नाही, मग एसटी कर्मचाºयांच्या हक्काच्या गोष्टी या सरकारने का म्हणून थांबवल्या.
दिवसभर राब-राबून पोटाची खळगीही पूर्ण न भरणाºया प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या एसटी कर्मचाºयांच्या फायद्यासाठी एकही कायदा आजपर्यंतच्या एकाही सरकारने पास केला नाही. खरंतर हा खेड्यापाड्यांचा महाराष्ट्र, साधू-संतांचा महाराष्ट्र, कष्ट करणाºयांचा महाराष्ट्र.
पण प्रांत नांदणाºया या एसटीच्या सोबतीला अर्थात उगवतीला, मावळतीला ‘बहुजन हिताय, बहुजन सुखायं’ या विचारधारने आजही हाच एसटीचा कर्मचारी उभा आहे. अगदी कर्त्या माणसाच्या यातनांच्या ओसरीवरच्या गप्पांचा मित्रही हाच एसटीचा कर्मचारी आहे.
दिवसभराच्या जनसेवेच्या फुलवलेल्या वहिवाटाची तुडुंब भूकेला घरून आणलेल्या शिदोरीतील कांदामिरचीचा, पिठलं-भाकरीचा त्यासोबत नांदणाºया लसणाच्या चटणीचा आस्वाद घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी गाढ झोपसुद्धा आजही हाच एसटीचा कर्मचारी घेत आहे आणि उगवणाºया प्रत्येक दिवसाला परत सेवाहीन होत आहे. हे सारं वेदनादायी आयुष्य या एसटीच्या प्रवासासोबत अगदी प्रत्येक कर्मचाºयाचं मांडलेलं आहे.
अगदी सणासुदीला सुद्धा जनसेवेसाठी सेवेचं वळण एसटीच्या सोबतीने प्रत्येक कर्मचारी घेत आहे. जनसेवेचं हे व्रत करत असताना, आगारातील बरेच कर्मचारी आपला संसार अर्ध्यावरती सोडून देवाघरी गेले सुद्धा; पण आपलं दु:ख घेऊन हा एसटी कर्मचारी कधीच थांबला नाही. उलट, धावत्या चाकावर आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाºया जोडगोळ्यांचे आयुष्य कसे असते, हे सुद्धा याच एसटी कर्मचाºयाने वेळोवेळी दाखवून दिले.
एसटीसोबतच्या प्रवासात आजपर्यंत कधी कोणी एकटे पडलेच नाही. प्रत्येकाला एसटी कर्मचाºयाच्या रूपात एक कुटुंब मिळाले. प्रेमाची, आपुलकीची माणसं मिळाली, जगण्याची कला मिळाली.
आजही खेड्यातल्या सर्वसामान्य माणसाला एसटी शिवाय प्रवासाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे खेड्यातल्या दुर्गम भागात असलेल्या प्रवासाला आधार म्हणून, तसेच १७ हजार कर्मचाºयांचे संसार वाचवण्यासाठी आता तरी सरकारने पुढाकार घ्यावा.
कारण एसटी वाचली, तर कर्मचारी वाचेल आणि कर्मचारी वाचला, तर प्रवाशी वाचतील.
– आकाश दीपक महालपूरे/7588397772\\