उन्हाळ्यात हृदयरोगींनी कशी काळजी घ्यावी?

उन्हाळ्यात हृदयरोगींनी कशी काळजी घ्यावी?

–    डॉ बिपीनचंद्र भामरे, मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे आपल्या शरीराच्या तापमानातही वाढ होते आणि त्यामुळे शारीरीक तापमान थंड ठेवण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात.  हृदयविकाराच्या समस्या असलेल्यांनी उन्हाळ्यात पुरेशी खबरदारी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. हृदयविकार असलेल्या व्यक्तीला या उकाडयाच्या दिवसांत काही महत्त्वाच्या आरोग्यदायी टिप्सबद्दल या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न.

हृदयरोग म्हणजे कोणतीही अवरोधित किंवा संकुचित रक्तवाहिनी ज्यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा एंजिना देखील होऊ शकते. तसेच, हृदयाच्या स्नायूंवर किंवा वॉल्व्हवर परिणाम करणाऱ्या परिस्थितींना हृदयरोग म्हणता येईल. हृदयरोग आणि उन्हाळ्यातील उष्णता हे एकत्रितपणे धोकादायक आहे.

उष्ण हवामानाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

जेव्हा तापमान वाढते तेव्हा शरीर वेगळ्या पद्धतीने कार्य करते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त जलद पंप करावे लागते. शरीराला नीट थंडावा न दिल्यास उष्माघाताचा झटका येऊ शकतो. हृदयाला अधिक कष्ट करावे लागतील, ज्यांना हृदयविकाराच्या आधीपासून समस्या आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा प्रचंड धोका असतो. खराब झालेले किंवा कमकुवत हृदय असलेल्या लोकांमध्ये उष्माघात, निर्जलीकरण, अतालता, एंजिना आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते, जी काही प्रकरणांमध्ये जीवघेणी असू शकते.

जाणून घ्या उन्हाळ्यात हृदयाची काळजी घेण्यासाठी विविध उपाय

व्यायामाचा अतिरेक नको – उन्हाळ्यात, शरीराचे तापमान जास्त असते आणि एखाद्याचे हृदय अधिक काम करते. कोणतीही कष्टदायक शारीरीक क्रिया करणार्‍याच्या -हदयाला रक्त जलद पंप करावे लागेल. विशेषत: सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान गरम हवामान टाळून घरामध्ये व्यायाम करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
पुरेसे पाणी प्या: पाणी हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि त्यामुळे आपले शरीर सर्व कार्ये सहजतेने करू शकतात. पुरेसे पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन टाळा – कॅफीन आणि अल्कोहोलमुळे निर्जलीकरण होते. हृदयविकार असलेल्यांसाठी निर्जलीकरण हे अत्यंत धोकादायक आहे. उन्हाळ्यात, एखाद्या व्यक्तीच्या शरीराला नियंत्रित तापमानात राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, म्हणून कॉफी, चहा किंवा अल्कोहोल टाळा जे तुम्हाला निर्जलीकरण करतात. तुम्ही ज्यूस, नारळ पाणी किंवा ताक देखील निवडू शकता. ज्यांनी अँजिओप्लास्टी केली आहे किंवा स्टेंट आणि कृत्रिम हृदयाच्या झडपा आहेत त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे कारण निर्जलीकरणामुळे रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे स्टेंट ब्लॉक होऊ शकतो.

संतुलित आहार घ्या – आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, कडधान्ये, मसूर आणि शेंगा खा. जंक फूड, मसालेदार, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर रहा.

डॉक्टरांच्या संपर्कात राहा: कोरोनरी हृदयरोग असलेल्या रुग्णांना उन्हाळ्यात हृदयावर दाब पडल्यामुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो आणि त्यांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. या लोकांना अॅट्रियल फायब्रिलेशन आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचाही धोका असतो. त्यामुळे हृदयविकार असलेल्यांनी निरोगी राहावे आणि तापमान वाढल्यावर आवश्यक ती खबरदारी घ्या

About Editor

अवश्य वाचा

मनाला निर्बंध :  अग्रलेख

  कोरोना गेला, आपण कोव्हिडमुक्त झालो, सगळे निर्बंध उठले, या भ्रमात सगळे जण अत्यंत गाफीलपणे …