आता पाहायचा अण्णा-शेवंताचा धुमाकू ळ

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले-३ ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. इंदूला कावेरी आणि सयाजीला मुक्त करण्याचा पर्याय वच्छीच्या रूपाने सापडला होता. वच्छीने अण्णा आणि शेवंताला बांधून ठेवले होते. कावेरी आणि सयाजीच्या शरीरातून शेवंता आणि अण्णांचे आत्मे बाहेर काढले होते; पण वाड्यात सगळे परतल्यावर सरिता आणि आणि छाया वच्छीला बाहेर काढतात आणि अभिराम दत्ता बंधनात ठेवलेल्या कावेरीला आणि सयाजीला बाहेर काढल्यामुळे त्या झाडांमध्ये, शरीरात पुन्हा शेवंता अण्णांचे आत्मे घुसतात. त्यामुळे आता इथूनपुढे अण्णा-शेवंताचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे, तो अर्थातच रंजक असेल.
वाड्यात अण्णा-शेवंताची भूतं सगळ्यांना त्रास देताना दिसतात. त्यामुळे इंदू सगळ्यांना वाडा सोडून शेतातल्या घरात राहायला जाण्याचा सल्ला देते. त्याप्रमाणे सगळे जण शेतातल्या घरात येतात; पण अभिरामचा हात धरून बाहेर पडताना वाड्याची वेस ओलांडतानाच कावेरीत शेवंता संचारते आणि ती अभिरामला धक्का देते. अस्खलीत मराठीत बोलून तिच्यातील शेवंता अभिरामला जाणवते. त्यामुळे अभिराम तिला तिथेच सोडून येतो. आता वाड्यावर फक्त शेवंता आणि अण्णा ही कावेरी आणि सयाजीची शरीरे घेऊन नांदू लागतात; पण हा वाडा परत मिळवायचा, या भूतांना हाकलून लावायचे. शेवंताच्या तावडीतून कावेरीला सोडवायचे, असा पणच इंदूने केलेला आहे.

सगळे जण कावेरीला नावे ठेवत असतात. तिच्या चारित्र्यावर संशय घेत असतात. अगदी अभिरामही तेच करतो; पण ती कावेरी नाही शेवंता आहे. शेवंता तिचे झाड म्हणून वापर करत आहे, हे लक्षात आल्यावर सगळेच हादरून जातात. त्यामुळे एकटी कावेरी वाड्यावर असली, तरी कोणाचे तिथे जाण्याचे धाडस होत नाही; पण म्हातारी इंदू गप्प बसत नाही. तºहे-तºहेचे प्रयत्न ती करत राहते. अखेर एका पुजाºयाला काही उपाय आहे, का विचारते, तेव्हा पुजारी पाच किलोमीटर अंतरावरील गावात जा, तिथे तुला उपाय मिळेल सांगतो. ती चालत तिथपर्यंत जाते. तर ये तुझीच वाट पाहत होते, असे शब्द तिच्या कानावर पडल्यावर तिला आश्चर्य वाटते.
ती असते तिची जाऊ वच्छी. जिचा खून अण्णांनी केलेला असतो. वच्छी आणि तिच्या नवºयाला पाठलाग करून अण्णा कड्यावरून ढकलून देऊन मारतात; पण वच्छी त्यातून बचावते आणि तिला कसली, तरी सिद्धी प्राप्त होते. तिच्यात अमूलाग्र बदल होतो. भावनांवर नियंत्रण ठेवत, डोळ्यातून पाणी येऊ न देता ही शक्ती ती जोपासते. त्यामुळे कितीही भयानक भूत असेल, तरी ती त्याचा बंदोबस्त करत असते; पण या वच्छीला पाहून इंदू परत जायला निघते, तेव्हा वच्छी सांगते, मी आता पूर्वीची दुष्ट वच्छी नाही. आता लोकांना मदत करण्याचे काम करते. तुझ्या भल्यासाठी मी तुला मदत करणार आहे, असे सांगते; पण इंदूचा विश्वास बसत नाही, तेव्हा तिच्या समोरच बाहेरच्या गावातून आलेल्या एका बाईचे भूत ती कसे उतरवते, हे पाहते आणि इंदूला वच्छी ही शेवंता-अण्णांचा बंदोबस्त करेल याचा विश्वास बसतो. वच्छीला घेऊन इंदू वाड्यावर येते. खंडीभर भात करून वच्छी ही अण्णा आणि शेवंताला खायला घालते. आग्रह करून त्या आत्म्यांना भरपूर खायला घालते. त्यांच्यापासून त्यांची झाडे कावेरी आणि सयाजीला बाहेर काढते आणि आत्मे बांधून ठेवते. वाड्यावर दुपारच्या जेवणाला सगळ्यांना घेऊन या, असे इंदूला ती सांगते. त्या आधी ठार वेडा झालेल्या माधवला मी बरा करणार आहे, असे सांगते. रात्रभर अण्णांचा आत्मा माधवला छळतो, त्यातून अण्णांवर कुरघोडी करत वच्छी माधवला वाचवते आणि पूर्ण शहाणा करते. दुपारी वाड्यावर सगळे येतात, तर माधव खडखडीत बरा, शहाणा झालेला असतो. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं; पण वाड्यावर वच्छी आहे आणि ती जीवंत आहे, हे कोणालाच माहिती नसते. इंदूने ते लपवून ठेवलेले असते. वाड्यावर कावेरीला भेटायला दत्ताची मुलगी पूर्वा जाते आणि बंधनात बेशुद्ध पडलेले सयाजी कावेरीला पाहते आणि समोर वच्छी असते. त्यामुळे ती किंचाळते. सगळे जण वर येतात. वच्छीला पाहून घाबरतात, चिडतात. इंदू समजवायचा प्रयत्न करते, तरी कोणी ऐकत नाही आणि वच्छीला घराबाहेर काढतात. बंधनातून सयाजी आणि कावेरीला बाहेर काढतात. त्यामुळे अण्णा-शेवंता खूश होतात. आता त्यांना त्यांची झाडे मिळतात. ते दोघे पुन्हा सर्वांना संपवायला तयार होतात.

त्यामुळे आता नाईक कुटुंबीयांना अण्णा-शेवंताची भुते कावेरी आणि सयाजीच्या शरीराचा वापर करून कशी छळतात आणि धुडघूस घालतात, हे पाहायला मजा येणार आहे. शेवंताची भूमिका करणारी कलाकार बदलली, तरी मालिकेतील रंजकता कुठेही कमी पडलेली नाही. मालिका आता शेवटच्या युद्धाला आलेली असावी, असे दिसते. आता सगळे जण पुन्हा वच्छीला शरण जाणार का?, अण्णा-शेवंताची भूतं वच्छीला लांब ठेवण्याचा काय प्रयत्न करणार, सुषल्या सयाजीला वच्छीजवळ जाऊ देणार का, ही आता रंजकता पाहायला मिळेल; पण झी मराठीवरील सध्या तरी ही एक चांगली मालिका आहे.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …