ठळक बातम्या

…आणि गड पायºया बोलू लागल्या

आम्ही दहेर गडाच्या पायºया. शिवकाळात शेकडो वर्षे नाशिक, पेठ हा परिसर व येथील भूमीची सेवा करण्यात गेली. काळाच्या ओघात आमचे अस्तित्व नाहीसे कधी झाले हे आम्हालाच कळले नाही. एक दिवस अचानक काही वेगळेच घडले. आम्ही पायºया नेहमीसारखे निवांतपणे पडून होतो. सकाळी-सकाळी थोड्या फार मोजक्या पावलांची चाहूल लागली, चला आला वाटतं शनिवार-रविवार आम्ही ओळखले.
शनिवार-रविवार म्हटले की, तुरळक पण दर्दी गडप्रेमी फिरकतात इकडे, आमचा किल्ला देहरगड तसा दुर्लक्षित व झाकोळला गेलेला. आमच्याकडे का यावे, असा कधी अट्टाहास नाही

पण आजकाल मॉलमधील तरुणाई यांची गर्दी बघून वाटते कधीकधी, या कधी आमच्याही अंगाखांद्यावर खेळायला, बागडायला, एक फोटो आमच्यासोबत काढायला, मॉलसारखे एकच सेल्फी पॉइंट नाही बरका आमच्याकडे. अगणित सेल्फी पॉइंट आहेत हो!
फक्त जरा जपून कडांवर, मॉलसारखे एसी हवा नाही; पण तुम्हास शुद्ध प्राणवायू (आॅक्सिजन) भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.

तुमच्या शरीराची शारीरिक चाचणी होऊन जाते फुकटमध्ये, मन प्रसन्न होते.
मानसिक ताणतणावातून मुक्त व्हाल याची ग्वाही देतो, फक्त जातांना प्लास्टिक कचरा भेट देऊन जाऊ नका हीच कळकळीची विनंती. असो!

एरवीही लवकर कोणी ना फिरकणारे आमच्याकडे. त्यामुळे आम्ही वाट बघतच असतो. आज येणार का कोणी आम्हाला भेटायला, गड प्रेमींची पाऊल आमच्यावरून गेली की, बरं वाटतं
कोणी कोणी येतात कधी कधी (मोजकेच). त्या बिचाºया मावळ्यांना तर माहीतच नाही की,

ज्या माती दगडगोटे, गवताहून ते चालत जात आहेत त्या खाली आम्ही दडलो गेलो आहे,
कितीतरी वर्षे झाली आहे की, आम्ही मोकळा श्वास घेऊ नाही शकलो. जीव गुदमरतोय, रडूच येते पण सांगणार कोणाला?

असा विचार करतच होतो आम्ही सर्व पायºया आणि आज असा भासच होऊ लागला कोणी तरी आम्हा पायºयांची कुजबुज ऐकली व आमच्या अंगावरील दगड गोटे, माती कोणीतरी बाजूला करताय की काय!
छे आजकाल आहे कोणाला वेळ?

कोणाचे काही मौल्यवान वस्तू हरवली असेल म्हणून शोधत असतील. आम्हाला काय करायचे तुमच्या सोन्या-चांदीचे. आम्ही पण बघितले आहे, एकेकाळी मोठे ऐश्वर्य. मध्येच काही शब्द कानावर आले की, इथे उंबरठा आहे. बहुतेक आता मात्र थोडी-थोडी खात्री व्हायला लागली आहे, कारण एवढ्या मोठ्या दगड-माती ढिगाºयाखाली किल्ले दरवाजाचा उंबरठा आहे. हे आम्ही पायºया सोडून कोणास माहीतच नाही. आनंदाश्रू आले की काय, तरी शंका आली. म्हटले थोडी वाट बघू नको अपेक्षाभंग व्हायला, जसजसा वेळ जाऊ लागला, फावडे, कुदळ यांचा आवाज घुमू लागला, आज शेकडो वर्षांनी शस्त्रांसारखा आवाज ऐकू येत होता, ऊर भरून आला.
नाईलाजाने पांघरलेले ओझे कमी होऊ लागले. हलके-हलके वाटू लागले, आता मात्र हळूहळू वाºयाची गिरकी आमच्या अवती-भवती होऊ लागली.

मावळे शेवटची माती छोटे दगड आता हळूवार हाताने काढायला लागली. आज खूप वर्षांनी प्रेमाचा स्पर्श अनुभवत होतो.
आम्ही पायºया एक-एक करत आकाशाचे दर्शन घ्यायला लागलो. आनंदाने नाचू-बागडू लागलो.

किल्ले दरवाजाचा उंबरठा अजून मातीत होता. आता मात्र आम्ही निश्चित होतो. थोड्याच वेळात प्रत्यक्ष उंबरठा ओलांडून मावळे येऊ शकणार होती.
आणि काही क्षणात उंबरठ्यासहित सर्व पायºया एकसाथ मोकळ्या बघून इतका वेळ आनंदाने श्रमदान करणारा प्रत्येक मावळा धन्य झाला होता. त्याच्या चेहºयावरील समाधान ओसंडून वाहत होते. हे सर्व बघून आम्ही सर्व पायºया खूप खूश झालो आणि का नाही होणार, आज आम्ही खूप सुंदर दिसत होतो.

आज कितीतरी वर्षांनी आम्ही किल्ले पायºयांनी मोकळा श्वास घेतला. एक विलक्षण आनंदात अलगद डोळे मिटून पुन्हा इतिहासात डोकावून गेलो. छत्रपती शंभू राजे यांच्या कारकिर्दीत जो रामशेजचा लढा पाच वर्षांहून जास्त अजिंक्य राहिला, त्याचे आम्ही साक्षात साक्षीदार.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर छत्रपती शंभू राजांना स्वयकिय मंत्र्यांचा विरोध व कारस्थान यांना तोंड द्यावं लागणार याचा सुगावा लागल्यामुळे औरंगजेब मनसुबा घेऊन आला.

आठ पंधरा दिवसांत एक-एक किल्ला घेऊ आणि वर्ष दीड वर्षात दिल्लीला परत निघून जाऊ.
पण त्यास काय ठाऊक होते की, वाघाच्या बछड्याशी टक्कर द्यायची आहे.

छत्रपतींच्या स्वराज्यात दाखल झाल्यावर मोगलांना मराठी मातीची झुंज काय आहे, याची प्रचिती दिली असा रामशेज किल्ला.
त्याच्याच समोर डौलाने उभा असलेला त्याचा साथीदार रांगडा गडी दहेरगड व त्याची एक पायरी.

– शाम आकुल/9370372685\\

About Editor

अवश्य वाचा

भारतीय संविधान दिन

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘जर मला संविधानाचा गैरवापर होत …

2 comments