अन्न हे पूर्णब्रह्म

अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इत्यादी पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या-त्या देवतेचे आवाहन करतात. कुंकूने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता, मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्वरा, त्याचे स्वीकार कर. लग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही पद्धत पुरातन आहे.
अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जाते. वधू-वरांचा विवाह संततीने सुफलित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. लग्नात भटजी ज्या वेळेला मंगलाष्टके म्हणतात, त्यावेळी अक्षता नवरा व नवरीच्या डोक्यावर पडल्या, तर त्यांचा संसार सुखाचा होतो. त्यामुळे भटजीने ‘शुभ मंगल सावधान’ म्हटले की, उपस्थित असणारे वºहाडी मंडळी नवरा व नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकतात. पण आपण कधी विचार केलाय का? आपण टाकलेल्या अक्षतांपैकी किती अक्षता त्या नवरा व नवरीच्या डोक्यावर पडतात? १० ते १५ टक्के सुद्धा पडत नाहीत. आपण टाकलेल्या अक्षतांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त अक्षता या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावर पडत असतात. काहीजण मुद्दाम या अक्षता एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला त्रास देण्यासाठी जोरात फेकून मारतात.

लग्न पार पडल्यानंतर हॉलमध्ये तांदळाचा सडा पडलेला दिसून येतो. हे सर्व तांदूळ उपस्थित लोकांच्या पायदळी तुडवले जातात. आपल्या संस्कृतीमध्ये ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणतो. असे तांदूळ आपणच पायदळी तुडवतो हे योग्य आहे का? एकट्या महाराष्ट्र राज्यात अंदाजे चार ते पाच लाख लग्न दरवर्षी होत असतात. प्रत्येक लग्नात सरासरी तीन ते चार किलो तांदूळ अक्षता म्हणून वापरल्या, तरी वीस लाख किलो तांदूळ आपण व्यर्थ वाया घालवत असतो. एकीकडे आदिवासी भागातील लोकांना पुरेसे अन्न खायला मिळत नसताना, एवढाले तांदूळ वाया घालवतो हे योग्य नाही.
महर्षी अण्णा कर्वे यांच्या पत्नी बयाबा‌ई कर्वे लग्नसरा‌ईच्या काळात कार्यालयातून फिरायच्या आणि अक्षता वेचायच्या. लोकांनी विचारल्यावर सांगायच्या की, माझ्या मुलींसाठी भात हो‌ईल याचा. त्यावेळेला लोक हसायचे, पण बयाबा‌ई नेटाने ते काम करत राहिल्या आणि आपल्या आश्रमातील अनाथ महिलांचे पोट भरत राहिल्या. १३५ वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळाऐवजी फुलांचा वापर अक्षता म्हणून करण्यात यावा, असा विचार मांडला होता. एकतर फुलांचा वापर हा काही खाण्यासाठी होत नाही. तसेच फुलांचा वापर वाढल्यास फुलांची शेती करणा‍ºया शेतकºयांना काम व पैसा मिळेल. तांदळाऐवजी फुलांचा अक्षता म्हणून वापर केल्यास मऊ मखमली आशीर्वाद मिळतील. पण समाजाची मानसिकता बदलायला हवी आणि हा बदल घडविण्यासाठी लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.

े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …