अग्रलेख – मराठी संस्कृतीला न्याय

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाºया बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती, मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा कुठे तरी मराठी संस्कृतीला न्याय मिळाला, आहे असे वाटते.

महाराष्ट्रातल्या ग्रामीण संस्कृतीत जत्रा हा एक अविभाज्य भाग आहे. हा शेतकºयांचा उत्सव असतो. यामध्ये तमाशाचा फड, कुस्तीचा फड, बैलगाडा शर्यती हा एक महत्त्वाचा भाग होता आणि आहे. बैलगाडी शर्यतीचा मान, त्यात जिंकणे हे फार शौर्याचे, अभिमानाचे लक्षण समजले जाते. पण गेली सात वर्षे या संस्कृतीपासून ग्रामीण भागाला लांब ठेवण्याचे प्रकार होत होते.
बैलगाडा शर्यत हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट्र सरकारने जी नियमावली तयार केली आहे, त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या शर्यती सुरू होणार यामुळे ग्रामीण महाराष्ट्राला सुखद अशी ही बातमी आहे.

याआधी राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता, मात्र त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेतकºयांचा वर्षानुवर्षे सुरू असलेला या खेळावर बंदी आणल्याने शेतकरी नाराज झाले होते. गेली काही वर्षे ही बंदी उठावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आग्रही होता. राज्य सरकारने मुकूल रोहतगी यांच्यासारखे अतिशय मोठे वकील या प्रकरणासाठी उभे केले होते. आजच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे.
खरंतर भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात ही मागणी होत होती. ही बंदी महाराष्ट्रात का घातली गेली हे अनाकलनीय आहे. काही विक्षीप्त प्राणीमित्र संघटना अशा तºहेच्या मागण्या करत असतात, पण त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातील एका संस्कृतीचा, खेळाचा अपमान होत होता. बैलगाडा शर्यत हा आपल्या मराठी चित्रपटाचाही एक फार मोठा भाग होता. कित्येक जुन्या ग्रामीण मराठी चित्रपटात बहारदार अशा बैलगाडा शर्यती दाखवल्या आहेत. सुषमा शिरोमणीच्या भिंगरी या चित्रपटातील बैलगाडा शर्यत ही रंगीत मराठी चित्रपटातील पहिली शर्यत होती. त्याअगोदर अनेक मराठी कृष्णधवल चित्रपटात अशा शर्यती दाखवल्या होत्या. २०११ साली सचिन पिळगांवकर याचा शर्यत नावाचा चित्रपट आला होता. त्याचा आत्माच बैलगाडी शर्यत हा होता.

शतकानुशतके चाललेली ही परंपरा बंद पाडण्याचा एक डाव साधला जात होता. पूर्वी दणकट अशा लाकडी बैलगाड्या होत्या. कालांतराने लोखंडी हलक्या कमी वजनाच्या आणि हलक्या चाकांची निर्मिती करण्यात आली आणि या विशेष गाड्या बनवल्या गेल्या. शेतीशी अत्यंत जवळ नाते असणारे बैल आणि बैलगाडी. शेतात नांगरण्यापासून बाजारात माल पोहोचवण्यापर्यंतचे काम बैलांकडून करून घेतले जात होते. हळूहळू शेतीत यांत्रिकता आली, ट्रॅक्टर आले पण बैलांचे महत्त्व कमी झाले नाही. बैलगाडा शर्यतीसाठी बैलांना पोसले जाऊ लागले. त्यांचा सराव केला जाऊ लागला, पण या परंपरेला थोपवण्याचे काम कुणीतरी करत होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र नाराज होता, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मराठी संस्कृतीला कुठे तरी न्याय मिळाला आहे, त्याचे समाधान मानावे लागेल.
शर्यतीसाठी तगडे बैल खरेदी करणे हे बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांसाठी महत्त्वाचे असायचे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील पुसेगांव येथील बैलबाजार हा फार मोठा बाजार आहे. याठिकाणी अतिशय मजबूत, तगडे बैल लाखो रुपये किमतीला खरेदी केले जातात. दहा वर्षांपूर्वी पुसेगांवातून पनवेलच्या पंढरीशेठ फडके यांनी १६ लाखांचा बैल खरेदी केल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते. या अगोदर बैलाला इतकी किंमत कधीच मिळालेली नव्हती. त्या बैलाची दखल देशभर घेतली गेली होती. घाण्याला किंवा शेतीकामाला बैल न जुंपता फक्त बैलगाडा शर्यतीसाठी त्यांनी एवढा मोठा खर्च केला होता. पुसेगांवप्रमाणेच कराडचा बैलबाजारही मोठा असतो. इथे आता शेतीसाठी कोणी बैल खरेदी करत नाही, तर बैलगाडा शर्यतीसाठीच ते खरेदी केले जातात. बैल हे आपल्याकडे शक्तीचे प्रतिक आहे. ताकद, बळ आणि मोलमजुरी, कष्टाची कामे करणाºयांचे ते प्रतिक आहे. त्यामुळे या कष्टकºयांना या शर्यतीतून नाव कमावण्याची, सन्मानाची संधी असते. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षित केले जाते. वर्षभर त्यांच्यावर मेहनत केली जात असते, पण कोणाच्या तरी मागणीने अशा संस्कृतीवर बंदी येते आणि या प्रथा थांबवण्याचा प्रयत्न होतो. पण सर्वाच्च न्यायालयाने ही बंदी उठवून शेतकºयांना आनंद देण्याचे काम केले आहे.

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …