ठळक बातम्या

अग्रलेख : काँग्रेसपुढची आव्हाने

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचे बिगुल वाजायचे बाकी असले आणि निवडणूक आयोगाने त्याविषयी कसलीही घोषणा केलेली नसली, तरी सर्वच राजकीय पक्षांनी मात्र आपल्या प्रचाराला आणि व्यूहरचनेला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसने तर जणू जाहीरनामाच सादर केला आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा महिला आरक्षणाचा मुद्दा उगाळला. काँग्रेस सत्तेत असल्यावर महिलांना नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार, अशी घोषणाच त्यांनी केली. मागच्या महिन्यात जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेस जरी चर्चेत असली, तरी त्यांच्यापुढची आव्हाने काही कमी नाहीत.

आगामी वर्षाच्या सुरुवातीला देशात होणा‍ºया पाच विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असतानाच काँग्रेस पक्षासमोर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्या राजकीय संकटाच्या रूपात उभ्या ठाकल्या आहेत. या निवडणुकांच्या काळात भाजपपेक्षा ममता बॅनर्जी यांना लगाम घालून त्यांच्या वक्तव्यांना, निर्णयांना चुकीचे ठरवण्याचे मोठे आव्हानही काँग्रेसला स्वीकारावे लागणार आहे. ममतांनी काँग्रेसचे नेते पळवायला सुरुवात केली आहे. काँग्रेसमधून तृणमूलकडे वळणारा वर्ग वाढला आहे. त्यामुळे तृणमूलचे आव्हान आहेच. पण नेमकी कोणाबरोबर युती करावी, कोणीशी आघाडी करावी याचा फार मोठा विचार काँग्रेसला करावा लागणार आहे. समाजवादी पार्टी आणि बसपा हे उत्तर प्रदेशात काँग्रेसला बरोबर घेण्यास तयार नाहीत. २०१७ च्या निवडणुकीत अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी पुन्हा सत्तेत येईल अशी ग्वाही प्रत्येकजण छाती ठोकपणे देत असतानाच भाजपला रोखण्यासाठी समाजवादी पार्टीने राहुल गांधींच्या काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि काँग्रेसचा सत्यानाश झालाच, पण समाजवादी पार्टीही कुठल्या कुठे फेकली गेली. २०० पेक्षा जास्त जागांचे स्वप्न पाहणाºया समाजवादी पार्टीला कशा बशा ५४ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला एका हाताच्या बोटांइतक्या म्हणजे फक्त ५ जागा मिळाल्या. काँग्रेसमुळे आपली ही अवस्था झाल्याचे सपाला समजले. त्यामुळे आता काँग्रेसला लांब ठेवण्याची भाषा ते करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला कोण बरोबर घेतो आणि कुणाचा आधार मिळतो, याची चिंता असतानाच ममता बॅनर्जी पळवापळवी करत आहेत ते नेतेही पळवू लागल्या आहेत. गोव्यात त्यांनी तेच केले. बाकीच्या राज्यांतही त्यांनी तोच प्रकार केला. त्यामुळे भाजप निवडणुकीत हरवेल आणि आपले संख्याबळ कमी करेल. ममता बॅनर्जी कार्यकर्ते पळवून आपल्याला संपवतील ही चिंता आज काँग्रेसला आहे.
त्यामुळेच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी अग्निपरीक्षापेक्षा कमी नाही. या निवडणुकांमधील विजयातूनच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची धार अधिक तीव्र होणार आहे. आपल्या जुन्या रूपात येऊन देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न होणार असले, तरी काँग्रेससाठी हा मार्ग इतका सोपा नाही. कारण, ममता बॅनर्जी यांनी देशात सत्तेत असणा‍ºया भाजपला काँग्रेस नव्हे, तर प्रादेशिक पक्षच समर्थपूर्वक आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये होणा‍ºया लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून उर्वरित पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्ष तयार करण्याबाबत भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे काँग्रेसपुढे ममता बॅनर्जीचे हे धोरण चुकीचे ठरवण्याचे आव्हानही उद्भवले आहे.

मागील काही महिन्यांत झालेल्या निवडणुकांमधील अपयशामुळे प्रादेशिक पक्षही काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. आता केवळ निवडणूकच नव्हे, तर पक्षातही विविध पातळ्यांवर घसरण होत आहे. सर्वांत जास्त वरिष्ठ नेते सोडून गेलेला पक्ष काँग्रेसच असल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे.
दुसरीकडे बंगालचे मुख्यमंत्रीपद तिस‍ºयांदा मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात जोरदार धडक देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्या वारंवार दिल्लीला भेट देत आहेत. याशिवाय अनेक प्रादेशिक पक्षांसोबत संभाव्य धोरणांची तयारी त्या करीत असून, त्यानुसार काँग्रेसला चालता येणार नाही. त्यामुळे या सर्व आव्हनांचा सामना काँग्रेसला आता आगामी काळात करावा लागणार आहे. त्यात हे ४० टक्के आरक्षणाचे गाजर कितपत यशस्वी ठरणार हा प्रश्नच आहे, पण प्रियंका गांधी सातत्याने नवीन नवीन घोषणा करताना दिसतात. ती काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का हे पण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसला आपली वाटचाल या निवडणुकीत चाचपडतच करावी लागणार आहे असे दिसते.

इतके दिवस फक्त भारतीय जनता पार्टीचे आव्हान काँग्रेसपुढे होते. आता स्वकियांचे आणि अंतर्गत विरोधकांचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. अशा परिस्थितीत नेतृत्वहिन असलेल्या या पक्षाची शक्य तितकी अवहेलना करण्याचे काम त्यांचेच मित्र पक्ष करत आहेत. येत्या काही दिवसांत काँग्रेसचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. त्याची तयारी गेली तीन महिने चालू आहे, पण सध्याच्या ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होईल की नाही, याबाबतही साशंकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गर्दी होऊ नये म्हणून या मेळाव्याला परवानगी नाकारली जाईल, असे संकेत गुरुवारीच दिलेले आहेत. त्यामुळे चहुबाजूने काँग्रेसला आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …