दंगल टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘सिंदूर की किंमत’मध्ये आता एक खूप मोठा ड्रामा होणार आहे. या मालिकेत लग्नाचे एक असे सिक्वेन्स येणार आहे. ज्यामुळे कथेत जबरदस्त ट्विस्ट
येणार आहे. मुंबईत या महत्त्वपूर्ण विवाह सिक्वेन्सच्या प्रोमोच्या शूटिंगदरम्यान अर्जुन (शहजाद शेख) आणि मिश्रीची भूमिका साकारत असलेल्या वैभवी हेंकरेसह संपूर्ण कास्ट
उपस्थित होती. मिश्री वधूच्या वेशभूषेत खूपच सुंदर दिसत होती.
अर्जुनची भूमिका साकारत असलेल्या शहजाद शेखने सांगितले की, आम्ही दंगल टीव्हीची मालिका ‘सिंदूर की किंमत’चा एक प्रोमो शूट केला आहे. ज्यात हे दाखवण्यात आले आहे की
अर्जुन दुसºया कुणासोबत तरी विवाह करून घरी आला आहे व तिचे नाव मिश्री आहे, जी या शोची हिरॉईन आहे. संपूर्ण घर या विवाहाच्या विरोधात असल्याने मालिकेत प्रचंड ड्रामा
तसेच ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार आहेत, जे प्रेक्षकांकरिता एक सरप्राईज पॅकेज ठरणार आहे. मिश्रीबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. खरेतर ती फ्रेशर आहे,
परंतु आपल्या व्यक्तिरेखेत एकरूप होण्यासाठी ती हरतºहेने प्रयत्न करताना दिसून येते.