सलमानने या अटीवर आनंद राय यांना दिले होते अतरंगी रे टायटल

नेहमी म्हटले जाते की, नावात काय असते?, परंतु वास्तविक नावात खूप काही असते. खासकरून फिल्म इंडस्ट्रीकरिता तर नक्कीच. तेथे एका नावाचे महत्त्व एखाद्या निर्मात्याला विचारा.

तोच सांगू शकेल की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव म्हणजे टायटल हा किती महत्त्वाचा बिझनेस आहे, परंतु याबाबतीत आनंद एल. राय हे खूप लकी ठरले. कारण त्यांना आपल्या दोन चित्रपटांचे टायटल हे कोणतीही मेहनत न घेता खूप सहजपणे मिळाले आहे. त्यापैकी अतरंगी रे या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
या चित्रपटासंदर्भात बोलताना आनंद राय यांनी सांगितले की, मी आपल्या सर्वात कॉम्प्लिकेटेड चित्रपट अतरंगी रेपासून एका भावा-बहिणीच्या अनोख्या बंधनाची कथा असलेल्या रक्षाबंधनपर्यंत पोहोचलो, परंतु त्यासंदर्भात एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे. ज्यावेळी मी या दोन्ही चित्रपटांच्या टायटलकरिता फिल्म असोसिएशनकडे गेलो होतो. त्यावेळेस

मला अतरंगी रे हे टायटल तर नाही मिळाले, परंतु जेव्हा मी रक्षाबंधन टायटल मागितले, तेव्हा कुणी त्यावर कथा लिहिण्याची गोष्ट तर सोडाच परंतु टायटलही कुणी रजिस्टर करून घेतले नाही.
आनंद राय पुढे म्हणाले की, तेव्हा दर्यादिल सलमान खानने अतरंगी रे हे टायटल त्यांना दिले. हे टायटल सलमानने आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या एका प्रोजेक्टसाठी रजिस्टर्ड करून घेतले होते, परंतु त्याने आनंद एल. राय यांना त्याचे हक्क दिले, मात्र सलमानने एका अटीवर हे टायटल आनंद राय यांना देऊ केले होते. सलमानने आपल्या असोसिएटला

सांगितले की, आनंद राय यांना टायटल तेव्हाच द्या, जेव्हा ते स्वत: चित्रपट दिग्दर्शित करतील आणि अशाप्रकारे आनंद एल. राय यांना आपल्या चित्रपटासाठी अतरंगी रे हे टायटल मिळाले. अतरंगी रे येत्या २४ डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

देशात २४ तासांत रुग्णसंख्या २५००० च्या आत

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान …