ठळक बातम्या

व्हायआरएफच्या ‘ द रेल्वेमॅन’ चा टिझर रिलीज

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात बड्या प्रोडक्शन हाऊसपैकी एक असलेल्या यशराज फिल्म्सने आतापर्यंत अनेक सुपरहिट आणि एव्हरग्रीन चित्रपट सादर केले असून, आता हे प्रोडक्शन हाऊस वेब सीरिजमध्ये नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहे. खरेतर आता वेब सीरिजचा जमाना आहे, तर यशराज फिल्म्स देखील यापासून कसे दूर राहणार होते. व्हायआरएफने नुकतीच आपल्या पहिल्या वेब सीरिजची घोषणा केली आहे. १९८४ मध्ये घडलेल्या भोपाळ गॅसगळती प्रकरणावर आधारित ही वेब सीरिज असेल. या दुर्घटनेला २०२१ मध्ये ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने व्हायआरएफने आपल्या पहिल्या वेब सीरिजची घोषणा टिझर शेअर करून दिली आहे.
यशराज फिल्म्स डेब्यू वेब सीरिजचे नाव ‘द रेल्वेमॅन’ आहे. या वेब सीरिजमध्ये एक नाही तर तब्बल चार कलाकार एकत्र दिसून येणार आहेत. इतकेच नव्हे दिवंगत अभिनेता इरफान

खानचा मुलगा बाबील देखील या वेब सीरिजमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बाबील व्यतिरिक्त या सीरिजमध्ये के. के. मेनन, मिर्झापूर फेम दिव्येंदू, व आर. माधवन
सारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ही सीरिज पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये २ डिसेंबरला प्रदर्शित केली जाणार आहे. डेब्यू दिग्दर्शक शिव रवैल या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …