सोशल मीडियावर एका जोडप्याची जोरदार चर्चा आहे. लग्नानंतर लगेचच हे जोडपे हनीमूनऐवजी स्मशानात पोहोचले. हनीमूनला जाण्याऐवजी हे जोडपे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले. जेव्हा लोकांना हे समजले, तेव्हा सर्वांनी त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली.
लग्न ही कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना असते. लग्नाआधी लोक त्याच्या तयारीत व्यस्त असतात आणि लग्नानंतर फिरायलाही जातात. लग्नानंतरच्या उपक्रमात म्हणजेच हनीमूनमध्ये जोडप्याचा आनंद पाहण्यासारखा असतो, पण लग्नानंतर लगेचच हनीमूनऐवजी जोडपे स्मशानात पोहोचले तर?, अशाच एका जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते लग्नानंतर लगेचच स्मशानात पोहोचले. दोघांनी मिळून स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय मुहम्मद रिदजीवन उस्मान आणि त्याची पत्नी नूर अफिफा हबीब (२६) चा विवाह १३ डिसेंबर रोजी झाला होता, पण लग्नानंतर हनीमूनला जाण्याऐवजी पती-पत्नीने कोविड वॉरिअर बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लग्नानंतर पहिल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंतिमसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरचा पहिला आठवडा हनीमूनऐवजी स्मशानात घालवण्याच्या या निर्णयाचे लोक कौतुक करत आहेत.
नवजात वर मुहम्मद रिदजीवन उस्मान, टीम कंगकुल कीचा सदस्य आहे, जी कोविड १९ च्या रुग्णांवर आणि त्यांच्या मृत्यूनंतर मोफत उपचार करते. मुहम्मद रिदजीवन उस्मानने सांगितले की, लग्नाच्या दुसºयाच दिवशी त्याला टीमकडून फोन आला की, कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे दफन करावे लागेल. त्याने हा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला, त्यानंतर तिनेही त्याच्यासोबत जाण्यास होकार दिला. हे जोडपे ताबडतोब स्मशानभूमीत गेले, जिथे त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रुग्णांवर अंत्यसंस्कार केले.
दाम्पत्याने सुलतान अब्दुल हलीम रुग्णालयात ठेवलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यावेळी इतर लोकांनीही त्यांना मदत केली. तो ज्या संघाचा भाग आहे, त्या संघात असे अनेक लोक आहेत जे समाजसेवेसाठी जोडलेले आहेत. हे लोक इतर ठिकाणी काम करत असले, तरी समाजसेवेसाठी या टीमला मदत करतात. त्याचवेळी, या जोडप्याने सांगितले की, या टीमसाठी त्यांचे काम सध्या थांबणार नाही. लग्नानंतर या जोडप्याने आतापर्यंत १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. लोक या कपलचे खूप कौतुक करत आहेत.