रेकॉर्डसाठी माणसाने तोंडात ११ विषारी साप ठेवले

अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाºया जॅकी बिबीने ११ विषारी साप तोंडात दाबून विश्वविक्रम केला, पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ही श्रेणीच रद्द केल्याने जॅकीचे स्वप्न भंगले आहे. गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड्सने आपल्या फेसबुक पेजवर जॅकीची छायाचित्रे शेअर करून याची घोषणा केली.
जगात असे अनेक लोक आहेत जे विश्वविक्रम करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. लोक विचित्र पराक्रम करून विक्रम करतात. कधीकधी लोक यासाठी मर्यादा ही ओलांडतात. असाच विश्वविक्रम करण्याची क्रेझ अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाºया जॅकी बिबीवर चढली. जागतिक विक्रम करण्यासाठी, जॅकीने ११ धोकादायक विषारी रॅटल स्नेक तोंडात दाबून धरले होते. हा पराक्रम जॅकीने २०१० मध्ये केला होता, पण आता ही श्रेणी गिनीज बुक आॅफ रेकॉर्डने रद्द केली आहे.

गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड्सने आपल्या फेसबुक पेजवर या रेकॉर्ड धारकाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॅकीने ११ साप तोंडात दाबले होते. जॅकीने या सर्व सापांना हाताने न धरता तोंडा दाबून ठेवले होते. हा विक्रम अतिशय धोकादायक होता. यापैकी कोणत्याही सापाने जॅकीला दंश केला असता, तर त्याचा मृत्यू निश्चित होता. असा धोकादायक स्टंट केल्यानंतर आता गिनीज बुक आॅफ रेकॉर्डने तो आपल्या यादीतून काढून टाकला आहे.
जॅकीने २०१० मध्ये हा विक्रम केला होता. आता ११ वर्षांनंतर तो यादीतून बाहेर काढण्यात आला आहे. गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड्सने आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे. आतापासून आपण या रेकॉर्डवर लक्ष ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारण दुसरा विक्रम करण्यासाठी हा स्टंट कोणी करत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की रॅटल स्नेक हा जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे. त्याच्या विषाचे काही थेंबही प्राणघातक असतात.

गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये जगभरातील अशा लोकांच्या रेकॉर्डचा हिशोब ठेवला जातो, जे अद्वितीय आहेत. जर कोणी काही वेगळे करत असेल आणि प्रत्येकाला ते शक्य नसेल तर त्याची नोंद गिनीज बुकमध्ये होते. काही वेळा हे रेकॉर्ड बनवताना लोकांना जीवही गमवावा लागतो. या नोंदींचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. जर कोणी जुना रेकॉर्ड मोडला तर नाव अपडेट केले जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

देशात २४ तासांत रुग्णसंख्या २५००० च्या आत

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान …