ठळक बातम्या

रिया दीपसी अवघ्या दोन तासांत ‘बुलेट’ बाइक चालवायला शिकली!

तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट अगदी मनापासून हवी असते, तेव्हा ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी अवघे विश्व सक्रिय होते. ‘झी टीव्ही’वरील ‘तेरे बिना जिया जाए ना’ या नव्या मालिकेत घोड्यावर बसलेल्या देखण्या राजकुमाराचे स्वप्न पाहणाºया क्रिशा चतुर्वेदीची कथा सादर करण्यात आली आहे, पण अवघे ब्रम्हांड जेव्हा तिचे हे स्वप्न खरोखरच साकार करते, तेव्हा काय घडते? या मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण नुकतेच झाले असून, या मालिकेला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असले, तरी त्यातील काही प्रसंगांमध्ये एक गूढ महिला दिसली असून, प्रेक्षकांमध्ये तिच्याबद्दल मोठी उत्कंठा लागली आहे. ही गूढ महिला कोण आहे?
ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रिया दीपसी आहे. या मालिकेत तिने एक महत्त्वपूर्ण पण रहस्यमय भूमिका साकारली असून, तिची ओळख हळूहळू करून दिली जाईल, मात्र यातील एका बाइकवरील प्रसंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरेल, यात शंका नाही. ‘तेरे बिना जिया जाए ना’मध्ये एका नाट्यमय प्रसंगात रिया बुलेट मोटारसायकलवरून फिरताना दिसेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आकाराने मोठी आणि अवजड बाइक रिया केवळ दोन तासांत चालवायला शिकली! विशेष म्हणजे तिने यापूर्वी आयुष्यात कोणतीच बाइक चालविली नव्हती. त्यामुळे रॉयल एन्फील्डची बुलेट इतक्या अल्पावधीत चालवायला शिकणे ही निश्चितच कौतुकास्पद कामगिरी म्हटली पाहिजे.

यासंदर्भात रिया दीपसी म्हणाली, मला जेव्हा आमच्या टीमने सांगितले की, एका प्रसंगात मला बुलेट बाइक चालवावी लागेल, तेव्हा माझ्या अंगात उत्साह संचारला. ‘तेरे बिना जिया जाए ना’ मालिकेसाठी आम्ही उदयपूरमध्ये आऊटडोअर चित्रीकरण करीत होतो. मालिकेसाठी काहीतरी नवे शिकायला मिळेल, म्हणून मी खुशीत होते. मी आजवर कोणतीच बाइक चालविली नव्हती आणि आता मला थेट बुलेट ही अवजड बाइक चालवायची होती. हे माझ्यासाठी एक आव्हानच होते. ती तशी थोडी जडच आहे, पण टीमच्या मदतीने मी काहीवेळ ही बाइक चालविण्याचा सराव केला आणि नंतर केवळ दोन तासांत मी ती बाइक उदयपूरच्या रस्त्यांवर आरामात फिरवीत होते. माझा प्रसंग सुंदरपणे चित्रीत झाला आणि इतक्या कमी वेळेत ही बाइक चालवायला शिकले, त्याबद्दल सर्वजण माझे कौतुक करीत होते. खरे म्हणजे माझीही तशी अपेक्षा नव्हती (हसते). त्यानंतर मी बराच वेळ उदयपूरमध्ये बाइकवरून भटकत होते. मला खूप मजा आली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …