रवीना टंडनच्या ‘ अरण्यक’ चा ट्रेलर रिलीज

अभिनेत्री रवीना टंडनची डेब्यू वेब सीरिज अरण्यकचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये रवीना एका पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
जी अनेक रहस्यांची उकल करण्याच्या प्रयत्नात आहे. नेटफ्लिक्स सध्या आपल्या कथा मोठ्या शहरांमधून काढून छोटी शहरे, गाव तसेच जंगलाच्या दिशेने घेऊन जाताना दिसून येतोयं.

ही वेब सीरिजही त्या शृंखलेचाच हिस्सा आहे.
‘अरण्यक’चा ट्रेलर पाहता रवीनाचे डिजिटल डेब्यू एकदम जोरदार ठरणार असल्याची खात्री पटते. या सीरिजमध्ये रोमांच, रहस्य आणि थ्रील या सर्व मसाल्यांचा पुरेपूर वापर करण्यात

आला आहे. ही वेब सीरिज पाहून कँडी या वेब सीरिजची आठवण येते, तर अनेकांना त्या कथा आठवतील ज्या कोरोना संक्रमण काळानंतर पूर्वोत्तर जंगलांमध्ये शूट केल्या जात आहेत.
‘अरण्यक’ची कथाही जंगलामध्ये घडताना दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये सुरुवातीपासूनच एका अज्ञात शक्तीचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतोय. कोणीतरी आहे जो चंद्रग्रहणाच्या

रात्री परततो आणि जेव्हा तो येतो तेव्हा सोबत लोकांचा मृत्यूही घेऊन येतो. या वेब सीरिजमध्ये रवीना टंडन सोबत आशुतोष राणा आणि परमब्रता चॅटर्जीही मुख्य भूमिकेत दिसून येणार
आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अज्ञात तरुणाची मुंबई विमानतळ परिसरात घुसखोरी

मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एका अज्ञात तरुणाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक …