माकडांसाठी बांधण्यात आला आहे झाडे आणि हिरवळीने भरलेला पूल

प्राण्यांवर प्रेम करणारे लोक तुम्ही पाहिले असतील. लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी सुंदर घरे आणि बागा सजवतात याबद्दल तुम्ही ऐकले असेल, परंतु तुम्ही क्वचितच कोणत्याही एका देशाचे सरकार प्राण्यांबद्दल इतके संवेदनशील पाहिले असेल की, ते त्यांच्यासाठी स्वतंत्र पूल बनवतात. ब्राझीलमधील रिओ दि जनरिओ येथे एक पूल बांधण्यात आला आहे, जो खास माकडांसाठी बनवण्यात आला आहे.
जगामध्ये प्राण्यांच्या अनेक लुप्तप्राय प्रजाती धोक्यात आहेत. एकेकाळी पृथ्वी निरनिराळ्या प्राण्यांनी भरलेली होती, पण हळूहळू मानवाच्या विकासाचा फटका त्यांना जीव देऊन चुकवावा लागला. आताही, प्राण्यांच्या अनेक प्रजातींची संख्या खूपच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ब्राझीलमधील सरकारने खास पूल बांधला आहे, जेणेकरून माकडे त्यावरून रस्ता ओलांडू शकतील.

हा पूल रिओ दि जनरिओच्या अटलांटिक फॉरेस्ट एरियामध्ये बांधण्यात आला आहे. येथील रस्त्यावरून जाणाºया वाहनांखाली येऊन माकडे व इतर प्राणी मरणार नाहीत, हाच या पुलाच्या बांधकामामागे शासनाचा हेतू आहे. यासाठी बांधण्यात आलेला पूल हिरव्यागार झाडांनी सजवण्यात आला आहे, जेणेकरून प्राणी सहज मार्ग शोधून रस्ता ओलांडून पुढे जाऊ शकतील.
ब्राझीलमध्ये माकडांच्या गोल्डन लायन टॅमरिन माकडांसाठी हा पूल बांधण्यात आला आहे. या प्रजातीच्या माकडांची संख्या बरीच कमी झाली आहे, त्यामुळे त्यांना अपघातात मरण्यापासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अटलांटिक वनक्षेत्रात विविध प्रजातींचे अनेक प्राणी राहतात, मात्र मध्यभागी महामार्ग असल्याने रस्ता ओलांडणारे प्राणी अनेकदा मरतात किंवा जखमी होतात. अशा परिस्थितीत हा पूल केवळ माकडांसाठीच नाही तर इतर प्राण्यांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. ते न घाबरता रस्ता ओलांडू शकतील.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये तामारिन प्रजातीच्या माकडांची संख्या आता केवळ २५०० झाली आहे. २०१८ मध्ये, पिवळ्या तापामुळे माकडांची संख्या ३२ % कमी झाली. महामार्ग असल्याने रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या जंगलात माकडांनाही जाण्याची भीती वाटत होती, त्यामुळे त्यांना पुलावरून मोठ्या परिसरात राहता येणार होते. गेल्या वर्षी बांधलेला हा पूल झाडे लावून हिरवागार ठेवला आहे. मात्र, ते माकडांच्या आवडीनुसार व्हायला वेळ लागेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

देशात २४ तासांत रुग्णसंख्या २५००० च्या आत

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान …