ठळक बातम्या

महिलेने पार्टी दिल्यावर मागितले जेवणाचे पैसे

काही लोक होस्टिंग मॅनर्समध्ये खूप चांगले आहेत, तर काहींना या कामात काही समस्या आहेत. तरीसुद्धा घरी मेजवानी दिल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार पाहुण्यांना चांगले अन्न देतो आणि त्यांच्या गरजांची काळजी घेतो. कल्पना करा की, जर कोणी तुम्हाला या होस्टिंगसाठी पैसे मागितले तर तुम्हाला कसे वाटेल? आपल्या देशात असे सहसा घडत नाही, पण ब्रिटनमध्ये एका महिलेने आपल्या घरी पार्टी आयोजित केल्यानंतर पाहुण्यांकडे जेवणाचे बिल मागितले.
आपल्या देशात पाहुण्यांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. घरात कोणी पाहुणे आले, तर त्यांना त्यांच्या पातळीपेक्षा चांगली सुविधा द्यावी असे प्रत्येकाला वाटते. तरीही कुठेतरी चूक झाली असेल, तर मनातून पश्चातापाची भावना असते. अशा परिस्थितीत जर आम्ही तुम्हाला सांगितले की, एका महिलेने आपल्या घरी पार्टी आयोजित केल्यानंतर पाहुण्यांकडे जेवणाचे पैसे मागितले, तर तुमच्यासाठी विश्वास ठेवणे थोडे कठीण होईल.

एका ब्रिटीश महिलेने आॅनलाइन शेअरिंग प्लॅटफॉर्मवर तिच्यासोबत घडलेली घटना कथन केली आहे आणि तक्रार केली आहे की, तिच्या एका नातेवाईक महिलेने सणानिमित्त मेजवानीचे आयोजन केले होते. मेजवानी संपल्यावर, तिने सर्व पाहुण्यांना त्याचे पैसे मागितले. ही घटना सांगताना महिलेने असेही सांगितले की, तिला ही गोष्ट खूप विचित्र आणि वाईट वाटली, पण तिच्या नातेवाईकाला याबद्दल काही वाटले नाही.
मम्सनेटवर तिची कहाणी सांगताना, या महिलेने सांगितले की, जेव्हा पाहुण्यांच्या घरी पार्टी होती, तेव्हा रात्रीच्या जेवणासाठी पैसे देणे हे आधी ठरलेले नव्हते, परंतु जेव्हा तिच्या नातेवाईकाने मेजवानी दिली, तेव्हा जेवणाचा खर्च विभागला गेला. त्यानुसार, मेजवानीला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ख्?????४५ म्हणजेच ४५०० रुपये द्यावे लागले. महिलेला हे कळल्यावर तिला खूप वाईट वाटले. अशाप्रकारे मेजवानी देऊन मग त्याचे कुणीही पैसे घेत नाहीत तशी अपेक्षाही नसते, असे या महिलेचे म्हणणे आहे. कारण आधीच पाहुण्यांनी घरातून कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी इतके पैसे खर्च केलेले असतात.

महिलेच्या या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी ते चुकीचे मानले नाही, तर काही लोकांनी या वागणुकीला वाईट म्हटले आहे. एका युझरने तर कमेंट करून ती मेजवानीचा फायदा कमावत असल्याचे म्हटले आहे, तर दुसºया युझरने याला असभ्य म्हटले आहे. असे काही लोक आहेत ज्यांनी ४५०० रुपये जास्त मानले आहेत, परंतु ज्यांच्याकडे पार्टी होती, त्यांनी पैशाची मागणी चुकीची मानू नका आणि अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये पैसे खर्च केले जातात असा खुलासा केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …