ठळक बातम्या

महिलेने कपड्यांप्रमाणे बदलले नवरे, ११ लग्न करून नवीन वराच्या शोधात

विवाह करणे हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. लग्नाआधी लोक भावी वधू किंवा वराची चौकशी करतात आणि नंतर कोणाला तरी जीवनसाथी करतात. मात्र, एका अमेरिकन (युनायटेड स्टेट्स न्यूज) महिलेने या लग्नाची चेष्टा केली. मोनेट नावाची महिला तिचा छंद पूर्ण करण्यासाठी लग्न करते. यामुळेच या महिलेने वयाच्या ५२ व्या वर्षांपर्यंत ११ लग्ने केली आहेत आणि विशेष म्हणजे ती अजूनही स्वत:साठी वराच्या शोधात आहे.
भारतीय समाजात विवाहाला खूप मोठा दर्जा दिला गेला आहे. ही एक सामाजिक प्रथा आणि धार्मिक संस्कार मानली जाते, जी सहजपणे मोडता येत नाही. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत कारण अमेरिकेत असे नाही. तिकडे ५२ वर्षीय महिलेने आपल्या आयुष्यात आतापर्यंत ११ लग्ने केली आहेत.

मोनेट नावाच्या या महिलेला नवीन पतीसोबत राहण्याची इतकी आवड आहे की, तिने आतापर्यंत ९ पतींशी ११ वेळा लग्न केले आहे. विशेष म्हणजे वयाच्या ५२व्या टप्प्यातही तिचे लग्नाचे व्यसन संपलेले नाही. ती अजूनही स्वत:साठी नवीन वर शोधत आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, मोनेटला लहानपणापासूनच लग्न करण्याची आवड होती. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला तिच्या भावाचे मित्र खूप आवडायचे आणि त्यांच्याशी लग्न करण्याची कल्पना होती. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्कूल पूर्ण होताच लग्न केले. तेव्हापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आजतागायत सुरू आहे. आतापर्यंत मोनेटने ९ वेगवेगळ्या पुरुषांशी ११ वेळा लग्न केले आहे. मोनेटचे कोणतेही लग्न फार काळ टिकले नाही आणि तिने वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केले.

मोनेटने टीएलसी चॅनलवर आपली कहाणी सांगितली. आजपर्यंत २८ जणांकडून लग्नाचे प्रस्ताव आल्याचे तिने सांगितले. ती सांगते की लग्न मोडल्यामुळे ती निराश होत नाही, तर पुढच्या व्यक्तीशी लग्न करते. तिच्या पतींबद्दल बोलताना ती म्हणते की तिचा ५ नंबरचा नवरा सर्वोत्कृष्ट होता, तर ६ नंबरचा नवरा चांगल्या स्वभावाचा होता. आठव्या क्रमांकाच्या नवºयाला ती आॅनलाइन भेटली होती, तर दहाव्या क्रमांकाचा नवरा तिला लहानपणापासून ओळखत होता. सध्या ती ५७ वर्षीय जॉनला डेट करत आहे. यापूर्वी दोनदा लग्न केल्यानंतर तिने जॉनला सोडले होते आणि आता ती त्याच्यासोबत १२वे लग्न करू पाहत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …