जगभरात लोकप्रिय ठरलेली वेब सीरिज मनी हाईस्टचा फायनल सिझन आज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दाखल झाला आहे. सीरिजच्या पाचव्या सीझनच्या दुसºया भागात या
सीरिजची कथा पूर्णपणे संपणार आहे, असे सर्वांचे मानणे आहे. प्रत्यक्षात मनी हाईस्टच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे.
मनी हाईस्टच्या मेकर्सनी या स्पॅनिश क्राईम वेब सीरिजच्या स्पिन आॅफ बर्लिनची घोषणा केली आहे. ही माहिती नेटफ्लिक्सने अलीकडेच सोशल मीडियावर दिली आहे. ही स्पिन आॅफ
सीरिज २०२३ मध्ये रिलीज केली जाणार आहे. ज्यात मनी हाईस्टमधील एक मुख्य व्यक्तिरेखा बर्लिनची बॅक स्टोरी पाहायला मिळणार आहे. मुळात बर्लिन हा मनी हाईस्टची प्रमुख
व्यक्तिरेखा आणि मास्टरमार्इंड प्रोफेसर अर्थात अलवारो मोर्तेचा मोठा भाऊ आहे जो रॉयल मिंट आॅफ स्पेनमध्ये एका हाईस्टदरम्यान प्रोफेसरनंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा टीम मेंबर
होता.