ठळक बातम्या

भावाला उलटे उभे करून त्याने १०० पायºया चढल्या; ५३ सेकंदांत केला विश्वविक्रम

तुम्ही कधी सर्कस पाहायला गेला असाल, तर तिथल्या कलाकारांना तुम्ही वेगवेगळे पराक्रम करताना पाहिले असेल. कधीकधी ते पराक्रम इतके आश्चर्यकारक असतात की, लोक ते पाहून थक्क होतात. आजकाल एका आश्चर्यकारक पराक्रमाचा व्हिडीओ खूप लोकप्रिय होत आहे, पण अनोखी गोष्ट म्हणजे हा सर्कसचा व्हिडीओ नसून, विश्वविक्रम करण्यासाठी हा करिष्मा करणाºया दोन भावांचा व्हिडीओ आहे.
२३ डिसेंबर रोजी स्पेनमधील गिरोना येथील सेंट मेरी कॅथेड्रलच्या पायºयांवर दोन भावांनी असा चमत्कार केला की, त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. सर्कसमध्ये काम करणारे व्हिएतनाममधील दोन भाऊ, ३७ वर्षीय जियांग क्वोक को आणि ३२ वर्षीय जियांग क्वोक एनघीप यांनी नुकतीच एक अप्रतिम कामगिरी केली. हा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे.

मोठ्या भावाने १०० पायºया चढल्या, धाकट्या भावाला डोक्यावर उलथापालथ करून, म्हणजे डोक्यावर उभे राहून. हे काम त्याने अवघ्या ५३ सेकंदांत केले. त्यानंतर त्याच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला. डिसेंबर २०१६ मध्ये दोन्ही भावांनी असाच एक्रोबॅटिक्स करून विश्वविक्रम केला होता आणि आता त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडून नवा विक्रम केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही भाऊ आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. एक भाऊ म्हणतो आज आपण खूप आनंदी आहोत. आम्ही काही तरी अद्वितीय साध्य केले आहे. आता आम्ही केवळ ५३ सेकंदांत १०० पायºया चढल्या आहेत. आम्ही हे करू शकलो, यावर माझा विश्वास बसत नाही. मला आशा आहे की, प्रत्येक जण आम्हाला लक्षात ठेवेल. काही दिवसांपूर्वी आम्ही खूप तणावाखाली होतो. वातावरण खूप थंड होते आणि आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत सराव करायचो. ५ वर्षांपूर्वी आम्ही ५२ सेकंदांत ९० पायºया चढल्या होत्या. आम्ही तुम्हाला सांगतो की, चर्चमध्ये फक्त ९० पायºया होत्या, त्यानंतर १० पायºया स्वतंत्रपणे बसवण्यात आल्या होत्या. भाऊंना ही शिडी चढणेही खूप अवघड होते, पण त्यांनी नवा विक्रम करून दाखवला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …