बेडुक दिसतो सुकलेल्या पानांसारखा

पृथ्वीच्या कानाकोपºयात पसरलेल्या जंगलांमध्ये अशा अनेक नवीन प्रजातींचे प्राणी आढळतात, ज्यांची आपल्याला माहिती नाही. आपण काही प्राणी चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्यांना दररोज पाहतो, परंतु काही प्रजाती अशा आहेत ज्या आश्चर्यकारक आहेत. बेडकाची अशीच एक प्रजाती सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, हा बेडुक पाहून तुम्ही क्षणभर विचारात पडाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सध्या असाच एक जीव सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, जो दिसायला खूपच विचित्र आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर असे दिसते की, ते एखादे कोरडे पान आहे, परंतु त्याने हालचाल केल्यावर तुम्हाला कळेल की हा एक प्रकारचा बेडुक आहे, जो या पृथ्वीवर आढळतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने त्याच्या हातावर एक नाही तर तीन बेडुक ठेवले आहेत. तुम्हाला वाटेल की, हा माणूस फक्त हातात कोरडी पाने घेऊन चुरगाळत आहे. मग ओले तळवे आणि त्यात होणारी हालचाल पाहिल्यानंतर तुमचे मन चक्रावून जाईल. खरेतर जे कोरड्या पानांसारखे दिसत आहे, ते बेडुक आहेत.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएफएस सुरेंद्र मेहरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. बेडकांची अशी प्रजाती आपण याआधी पाहिली नव्हती. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांना ते पाहून आश्चर्य वाटते. बेडकाचे डोळेसुद्धा कोरड्या पानात लपल्यासारखे असतात आणि पानांच्या देठासारखी रचना त्यांच्या त्वचेवर दिसते.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेक युझर्स थक्क झाले आहेत. काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये हा कोणता प्राणी आहे, असे विचारले आहे, तर अनेकांनी असा प्राणी पहिल्यांदाच पाहिल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशा बेडकांना मलायन शिंग असलेला बेडुक म्हणतात. हे बेडुक बहुतेक पावसाच्या जंगलात आढळतात. ते थायलंडच्या दक्षिण भागात आढळतात. वाळलेल्या पानांमुळे ते शिकारीपासून पळून जाण्यास आणि शिकार करण्यास देखील मदत करतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

देशात २४ तासांत रुग्णसंख्या २५००० च्या आत

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान …