ठळक बातम्या

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून येणार आइस्क्रिमची चव!

जर तुम्हाला सांगितले गेले की, व्हॅनिला फ्लेवर्ड आइस्क्रिम प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवता येते, तर तुम्ही कदाचित ही गोष्ट विनोद म्हणून टाळाल. तरीही तीच गोष्ट शास्त्रज्ञांच्या तोंडून ऐकायची असेल, तर ती खरी मानावी लागेल. शास्त्रज्ञांनी एक मार्ग शोधून काढला आहे. ज्याद्वारे व्हॅनिला फ्लेवरचा मजेदार स्वाद प्लास्टिकच्या बाटल्यांमधून आइस्क्रिममध्ये जोडला जाऊ शकतो. हा एक अतिशय मनोरंजक दृष्टिकोन असेल.
जगभरातील पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केल्यानंतर त्यांचा पुनर्वापर कसा करायचा याचा मार्ग शोधत आहेत. कोणी म्हणतात की, ते घर बांधण्यासाठी वापरले जाऊ शकते, तर कोणी दुसरे मार्ग सांगतात, मात्र आता शास्त्रज्ञांनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून स्वादिष्ट व्हॅनिला आइस्क्रिम बनवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे.

लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी प्लास्टिकच्या कचºयाच्या बाटल्यांमधून व्हॅनिलिन काढून व्हॅनिला फ्लेवर तयार करण्याचा मार्ग शोधला आहे. आतापर्यंत व्हॅनिला एसेन्समध्ये वापरले जाणा‍रे ८५ टक्के फ्लेवर रसायनांपासून बनवले जातात, तर उर्वरित व्हॅनिला बीन्सपासून बनवले जातात. आता या पद्धतीत थोडा बदल करून प्लास्टिकच्या बाटल्यांमधून व्हॅनिला इसेन्स तयार करण्याचे तंत्र शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
व्हॅनिला फ्लेवरचा वापर अन्न आणि पेय, कॉस्मेटिक, फार्मा, स्वच्छता आणि तणनाशक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अशा परिस्थितीत आता शास्त्रोक्तपद्धतीने त्याचे उत्पादन केले जाणार आहे. नवीन संशोधनात, संशोधकांनी सांगितले आहे की, प्लास्टिकपासून व्हॅनिलिन तयार केले जाऊ शकते, ज्यामुळे प्लास्टिकचे प्रदूषणदेखील कमी होईल. एडिनबर्ग विद्यापीठातील दोन संशोधक अनुवांशिक अभियांत्रिकीद्वारे प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाºया टेरेफ्थालेट अ‍ॅसिडचे व्हॅनिलिनमध्ये रूपांतर करतील. या दोन्ही घटकांमध्ये समान रसायन आढळते. गार्डियनच्या अहवालानुसार, जेव्हा त्यांना एका दिवसासाठी ३७ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात आले, तेव्हा ७९ टक्के टेरेफथॅलिक अ‍ॅसिडचे व्हॅनिलिनमध्ये रूपांतर झाले.

एका अहवालानुसार, २०१८ मध्ये व्हॅनिलिनची जागतिक मागणी ४०,८०० टन होती, जी २०२५पर्यंत ६५,००० टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत प्लास्टिकच्या कचºयापासून व्हॅनिला इसेन्स तयार करायला सुरुवात केली, तर प्लास्टिकचा कचराही कमी होऊन व्हॅनिलाची मागणीही पूर्ण होऊ शकेल. जगात दर मिनिटाला एक दशलक्ष प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या जातात आणि त्यापैकी फक्त १४ टक्के रिसायकल केल्या जातात. अशा स्थितीत या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्यास प्लास्टिक कचºयाचे व्यवस्थापन सोपे होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

तब्बल दहा वर्षांच्या दुराव्यानंतर अर्नोल्ड श्वाजेर्नेगर याचा झाला घटस्फोट

कदाचित हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वाधिक वर्षांनंतर झालेला घटस्फोट असेल. अर्नोल्ड श्वाजेर्नेगर व त्याची पत्नी मारिया …