पोटाऐवजी महिलेच्या यकृतात आढळला गर्भ

कॅनेडियन बालरोगतज्ज्ञ डॉ. मायकल नार्वे यांनी गर्भधारणेच्या एका अनोख्या केसबद्दल सांगितले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच लोकांना धक्का बसला आहे.
आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी मोठी गोष्ट असते. गर्भधारणेमुळे स्त्रीचे आयुष्यच बदलत नाही, तर तिच्या शरीरातही अनेक बदल होतात. असे असूनही स्त्री तिच्या गर्भधारणेचा आनंद घेते, पण प्रत्येक जण भाग्यवान नाही. जगातील अनेक महिलांना त्यांच्या गरोदरपणात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. असेच एका विचित्र गर्भधारणेचे प्रकरण यापूर्वी कॅनडातून समोर आले होते. येथील एक गर्भवती महिला डॉक्टरकडे आली असता तिच्यासमोर एक विचित्र परिस्थिती समोर आली.

कॅनडाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मायकल यांनी त्यांच्या टिकटॉक अकाऊंटवरील व्हिडीओद्वारे या प्रकरणाची माहिती दिली. डॉ. मायकल यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारची प्रकरणे पाहिली, परंतु अशी केस कधीच पाहिली नाही. डॉक्टर मायकल यांच्याकडे एक ३३ वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. महिलेची मासिक पाळी १४ दिवस चालली होती, तर गेल्या दीड महिन्यापासून तिला मासिक पाळी येत नव्हती. यामुळे ती गर्भधारणेची खात्री करण्यासाठी डॉक्टरांकडे आली होती.
महिला गर्भवती असल्याची डॉक्टरांनाही खात्री होती. याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी महिलेचे अल्ट्रासाऊंड केले. या अल्ट्रासाऊंडच्या अहवालाने डॉक्टरांसह महिलेलाही आश्चर्याचा धक्का बसला. खरेतर ती महिला गरोदर होती, पण मूल तिच्या गर्भाशयात नव्हते. नातेसंबंध बनवल्यानंतर शुक्राणू कसेतरी महिलेच्या यकृतात गेले आणि महिलेच्या यकृतामध्ये भ्रूण वाढू लागला. डॉक्टरांनी सांगितले की, महिलेच्या यकृतामध्ये एक्टोपिक गर्भधारणा आढळून आली आहे. एक्टोपिक गर्भधारणा तेव्हा होते, जेव्हा अंडी फॅलोपियन ट्यूबमध्ये चुकीच्या दिशेने प्रवास करू लागते आणि यामुळे गर्भधारणा योग्यरित्या होत नाही. हे पोटात अनेकदा दिसले, पण यकृताच्या आत हे पहिल्यांदाच दिसले.

हा प्रकार पाहताच डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा जीव वाचला, मात्र यकृताच्या आत गर्भ आधीच मृत झाला होता. अशा स्थितीत डॉक्टरांनी यकृतातून मृत गर्भ बाहेर काढला. जर आपण इतिहासाबद्दल बोललो तर, जर्नल आॅफ इमर्जन्सीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, २०१२ मध्ये, एका महिलेच्या यकृताशी १८ आठवड्यांचा गर्भ जोडलेला आढळला होता. महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यादरम्यान रक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

देशात २४ तासांत रुग्णसंख्या २५००० च्या आत

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४,८१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान …